शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांच्या वावरामुळे जॉगिंग ट्रॅकवर दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:22 IST

हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या मनपा क्रीडा संकुलानजीक महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून काही नागरिक पहाटे पाळीव श्वान घेऊन फिरत असल्याने या ट्रॅकवरच त्यांचे विधी आटोपले जात आहेत.

पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या मनपा क्रीडा संकुलानजीक महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून काही नागरिक पहाटे पाळीव श्वान घेऊन फिरत असल्याने या ट्रॅकवरच त्यांचे विधी आटोपले जात आहेत. अगोदरच या ट्रॅकला भटक्या श्वानांनी विळखा घातलेला असताना त्यात पाळीव श्वानांची भर पडल्यामुळे ट्रॅकवर दहशत निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने पाळीव श्वान ट्रॅकवर फिरविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त जॉगर्सनी केली आहे.महापालिका प्रशासनाने हिरावाडीत तयार केलेल्या मातीच्या जॉगिंग ट्रॅकमुळे शेकडो नागरिकांना जॉगिंग ट्रॅकचा मोठा उपयोग होत आहे. प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून केलेल्या ट्रॅकमुळे परिसराच्या विकासातदेखील भर पडली आहे. रोज पहाटे शेकडो महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक ट्रॅकवर फिरण्यासाठी येत असतात. पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत पायी फिरण्यासाठी येणाºया नागरिकांची मोठी गर्दी असते. दरम्यान, याच कालावधीत परिसरात राहणाºया काही नागरिकांकडून जॉगिंग ट्रॅकवर आपल्या पाळीव कुत्र्यांना विधी करून घेण्यासाठी घेऊन येतात. त्यामुळे ट्रॅकवरच या कुत्र्यांचे मलमूत्र टाकले जाते. त्यामुळे सकाळी फिरण्यासाठी येणाºया नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.सूचनांकडे दुर्लक्षजॉगिंग ट्रॅकवर श्वान आणणाºया नागरिकांना अडविले तर सदर ट्रॅक महापालिकेचा आहे, आम्ही बघून घेऊ तुम्ही आम्हाला सांगू नका असा वाद घालतात. जॉगिंग ट्रॅक नागरिकांना फिरण्यासाठी असल्याने पाळीव श्वानांना आणू नये, अशी सूचना नागरिकांनी यापूर्वीच करण्यात आलेली दुर्लक्ष होत असल्याने जॉगिंग ट्रॅक नागरिकांसाठी की पाळीव श्वान फिरविण्यासाठी, असा सवाल नागरिकांनी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :dogकुत्राNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका