शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार मतदारांची होणार अडचण

By admin | Updated: February 16, 2017 23:30 IST

प्रभाग १३ : दूरवरील मतदान केंद्रांमुळे गैरसोय

नाशिक : मतदारांच्या सोयीच्या ठिकाणी आणि जवळ मतदान केंद्रे असावीत, अशी निवडणूक आयोगाची भूमिका असताना नाशिक शहराच्या प्रभाग १३ मध्ये मात्र, केवळ शिवसेना उमेदवाराच्या सोयीसाठी मतदान केंद्रे दूरवर म्हणजे दोन किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आली असून, त्यामुळे दहा हजार मतदारांना मतदान करणे अडचणीचे होणार आहे, त्यामुळे ही मतदान केंद्रे स्थानांतरित करावी, अशी मागणी कॉँग्रेस उमेदवारांनी केली आहे.प्रभाग १३ मध्ये असलेले कॉँग्रेसचे उमेदवार शाहू खैरे, वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे गजनान शेलार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरेखा भोसले यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. बालाजी कोट, नाव दरवाजा, दत्त कोट, आसराची वेस, मधली होळी, चित्रघंटा, कापड बाजार तसेच गाडगे महाराज धर्मशाळा या परिसरातील १० हजार ७९६ मतदारांसाठी इतर ठिकाणी अतिशय लांबच्या जागेवर मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेहरू चौक, कापड बाजार, कानडे मारुती लेन, तिवंधा चौक, सराफ बाजार येथील मतदारांना बालाजी कोट शॉपिंग सेंटर जवळ असताना प्रत्यक्षात मात्र सारडा कन्या विद्यालय हेच केंद्र देण्यात आले आहे. बालाजी कोट, मुरलीधर लेन येथील मतदारांना शासकीय अध्यापिका महाविद्यालय केंद्र देण्यात आले आहे. त्यांनाही बालाजीकोट हे केंद्र जवळचे होते. दत्तकोट, गाडगे महाराज पूल, नाव दरवाजा, गाडगे महाराज धर्मशाळा, आसराची वेस, मोदकेश्वर मंदिर परिसरातील मतदारांना महापालिकेच्या मालकीचे गाडगे महाराज शॉपिंग सेंटर जवळचे असताना प्रत्यक्षात मात्र धान्य बाजारातील मनपा शाळा क्रमांक १२ मध्ये मतदान केंद्र जोडण्यात आले आहे.गाडगे महाराज धर्मशाळेच्या परिसरातील मतदारांना वावरे लेनमधील मराठा समाज मंगल कार्यालयात जोडण्यात आले आहे. म्हणजेच या मतदारांच्या परिसरात मतदान केंद्रांची व्यवस्था न करता एक ते दोन किलोमीटर अंतरावरील मतदान केंद्रांवर जोडण्यात आले आहेत. महिला आणि वृद्ध मतदारांना मतदान करता येऊ नये यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.