शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

चांदवडनजीक अपघातात दहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:46 AM

चांदवड : उज्जैनहून देवदर्शन आटोपून परतणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचे आडगाव टप्पा शिवारात अचानक टायर फुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघातात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास सदर दुर्घटना घडली.

ठळक मुद्दे१४ जण जखमी : देवदर्शन करून परतताना दुर्घटना

चांदवड : उज्जैनहून देवदर्शन आटोपून परतणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचे आडगाव टप्पा शिवारात अचानक टायर फुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघातात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास सदर दुर्घटना घडली. मृतांमध्ये उल्हासनगर व कल्याण परिसरातील गुजराथी कुटुंबातील सात महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे.उल्हासनगरच्या राजीव नागदेव यांची साई ट्रॅव्हल्सची टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच ०५ आरओ ३५७) या बसने सोमवारी चालक संतोष किसन पिठले (३८, रा. उल्हासनगर) हा २२ भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी घेऊन गेला होता. त्यात उल्हासनगर, कल्याण व नाशिकच्या भाविकांचा समावेश होता. ओंकारेश्वर, महाकालेश्वर, उज्जैन येथील देवदर्शन आटोपून ती टेम्पो ट्रॅव्हलर बस उज्जैन येथून बुधवार दि. ६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास परतीच्या प्रवासास निघाली होती. चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा येथे पहाटे पाच वाजुन चाळीस मिनिटांच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसचे टायर अचानक फुटले. बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर बस रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर (एम.एच.१५ सी.के.८४२२) जाऊन आदळली. अपघाताचा आवाज प्रचंड असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता, तर १४ जण गंभीर जखमी झाले होते. यावेळी सोमा कंपनीचे गस्तीपथक, रुग्णवाहिका, सरकारी रु ग्णवाहिकेच्या साहाय्याने मृत व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. जखमींवर डॉ. राजपुत, डॉ. गाडेकर, डॉ. श्रीमती केदार यांनी उपचार सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चांदवड शहरातील खासगी डॉक्टरांना मदत कार्यासाठी बोलविले. त्यात डॉ. जीवन देशमुख, डॉ. संदीप देवरे, डॉ. कुंभार्डे, डॉ. सतीश गांगुर्डे व तळेगावरोही प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. खैरनार यांनी औषधोपचार केले. १४ जखमींपैकी नऊ जणांवर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. मृतांची ओळख पटविण्यासाठी बºयाच वेळ लागला. कारण मृतांचे नातलग कल्याण व उल्हासनगर येथून येण्यास उशीर लागला.घटनास्थळी तातडीने धाव घेत पोलिस निरीक्षक अनंत मोहिते उपनिरीक्षक कैलास चौधरी,रामचंद्र जगताप व पोलीस कर्मचारी बापु चव्हाण, पालवी, बिन्नर, मंगेश डोंगरे, दीपक मोरे, संसारे, देशमुख, हेमांडे यांनी मदत कार्य केले .