शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवस ती राहिली आपल्या बहिणीच्या मृतदेहासोबत धक्कादायक घटना : देवळाली कॅम्प येथील घटनेने सारेच थक्क; मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप खुलासा नाही; दोन्ही बहिणी मनोरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:47 IST

देवळाली कॅम्प/भगूर : दहा दिवसांपूर्वी मयत झालेल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मोठी बहीण मृतदेहाजळच बसून असल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथे समोर आली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने सदर प्रकार उघडकीस आला.

देवळाली कॅम्प/भगूर : दहा दिवसांपूर्वी मयत झालेल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मोठी बहीण मृतदेहाजळच बसून असल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथे समोर आली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने सदर प्रकार उघडकीस आला.देवळाली कॅम्प विजयनगर परिसरात पंचमोती सोसायटीत राहणाऱ्या कविता दिगंबर बागुल (४४) या महिलेचा दहा दिवसांपूर्वी मृत्यू झालेला असताना तिची मोठी बहीण मीना दिगंबर बागुल ही गेल्या दहा दिवसांपासून प्रेताजवळच बसून होती. शेजारील नागरिकांनी बागुल यांचे नातेवाईक रवींद्र रमेश खरोटे यांना माहिती दिली. ते स्वत: घटनास्थळी आले असता त्यांना कविता बागुल या मयत अवस्थेत आढळून आल्या. त्यांचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत होते तर मीना बागुल या फक्त सुन्न नजरेने मृतदेहाकडे पाहत होत्या. या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असल्याने एकत्रच याठिकाणी राहात होत्या.सदर घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना कळवली असता सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती बघून त्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, कविता बागुल यांचे नातेवाईकही तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी रात्री उशिरा जागेवरच पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिवाळीपूर्वी या मुलींची मावशी आणि काका त्यांची भेट घेऊन गेले होते.दिगंबर बागुल हे मुंबई येथे एमटीएनएलच्या सेवेत होते. अठरा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर देवळाली कॅम्प येथे पत्नी कांताबाई बागुल, मुली मीना व कविता यांच्यासह राहात होते. तीन वर्षांपूर्वी दिगंबर बागुल व कांता बागुल यांचे निधन झाल्याने दोन्ही मुलींवर मानसिक आघात झाला. त्यातून त्या मनोरु ग्ण झाल्या. दोघी बहिणींपैकी मीना बागुल यांचा विवाह घोटी येथे झालेला होता. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याही मनावर परिणाम होऊन लहान बहीण कविता बागुल सोबत त्या राहू लागल्या होत्या. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी नातेवाईक मामा, आत्या, काका, मावशी हेच बघत होते.आई-वडिलांच्या मृत्यूनंतर प्रचंड मानसिक धक्का बसल्यामुळे दोघी बहिणी मानसिकदृष्ट्या कमकुवत झाल्या आणि त्यातूनच त्या मनोरुग्ण झाल्याने काही वर्ष त्या एकत्रित, परंतु एकाकी जीवन जगत होत्या. अभावानेच त्यांच्याकडे नातेवाइकांचे येणे होते. दिवाळीपूर्वी या मुलींची मावशी, काका त्यांना भेटून गेले होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघड झाली. कविताचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबाबत काहीही माहिती नाही.

टॅग्स :Nashikनाशिक