शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

दहा दिवसांनंतर जिल्ह्याला मिळाली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 01:50 IST

गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या लसींचा साठा उपलब्ध झाला असल्याने, जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५९१ लसीकरण केंद्रांवर लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे वाटप केले जाणार आहे. कोविशिल्डचे ८८ हजार तर कोव्हॅक्सिन ७ हजार ४०० डोसेस प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्दे९५ हजारांचा साठा: ८८ हजार कोविशिल्ड, ७ हजार कोव्हॅक्सिन

नाशिक : गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या लसींचा साठा उपलब्ध झाला असल्याने, जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५९१ लसीकरण केंद्रांवर लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे वाटप केले जाणार आहे. कोविशिल्डचे ८८ हजार तर कोव्हॅक्सिन ७ हजार ४०० डोसेस प्राप्त झाले आहेत.

केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लसींचे डोस प्राप्त होत नसल्याने डोससाठी वाट बघावी लागत असल्याने, त्याचा परिणाम लसीकरणावरही होत आहे. जिल्ह्यातील साठा दोन दिवसांपूर्वीच संपल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लसीकरणही ठप्प झाले होते. त्यामुळे अधिक लसींची आवश्यकता असतांनाच जिल्ह्यासाठी तब्बल ९५ हजार इतके लसींचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा लसीकरणाला गती मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्याला आजवर प्राप्त झालेल्या लसींच्या आधारे २० लाखांच्या पुढे लसीकरण करण्यात आलेले आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून जिल्ह्यात जास्तीतजास्त लसीकरण करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. कोरोनाची लाट रोखून धरण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्यामुळे त्या दृष्टीने लसीकरण वाढविले जात आहे. त्यासाठी सातत्याने केंद्राकडे मागणी नोंदविली जात आहे. जिल्ह्याने आतापर्यंत २० लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. त्यात १४ लाख ८९ हजार ४४‍१ नागरिकांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे, तर ५ लाख १९ हजार नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. एका दिवसात ४४ हजार नागरिकांचे लसीकरण हा जिल्ह्याचा विक्रम आहे. हा विक्रम मागे टाकण्यासाठीचे नियोजनही केले जात आहे.

नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीत १८२ केंद्रे असून, त्यामध्ये सरकारी आणि सेवाभावी संस्थांची केंद्रे आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३८५ तर मालेगाव मनपा हद्दीत २४ लकीकरण केंद्रांवर लसपुरवठा केला जात आहे. लसीकरणाला गती मिळावी, यासाठी २६ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रशासनाने परवानगी दिली असून, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केले जात आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनसोबत रशियाची व्ही.स्पुतनिक ही लसही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तूर्तास स्पुतनिक ही लस चार खासगी रुग्णालयांतून दिली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस