शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

काळाराम मंदिराचे बदलणार रूपडे

By admin | Updated: August 18, 2016 00:50 IST

नवे रूप : लेझर शो, कारंजे, चित्र प्रदर्शनातून मांडणार इतिहास

 नाशिक : सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकच्या श्री काळाराम मंदिराचे रूप आता बदलणार आहे. लेझर शो, कारंजे आणि प्रभू रामचंद्रांचा जीवनपट मांडणारे चित्र प्रदर्शन या माध्यमातून काळाराम मंदिर परिसर अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. बाळासाहेब सानप यांनी आमदार निधीतून पाच कोटी रुपयांची मदत दिली असून त्यामुळे हा बदल करण्यात येणार आहे.नाशिक म्हटले की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी म्हणून गौरवाने उल्लेख होतो. काळाराम मंदिराच्या माध्यमातूनही हेच स्मरण होत असते. या मंदिराला पुरातत्त्व खात्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी जतन करण्यात आले आहे. देशभरातून पर्यटक आणि भाविक मंदिरात येत असतात. काळानुरूप आता या मंदिर परिसराला आणखीच आकर्षक करण्याचा विश्वस्त मंडळाचा प्रयत्न होता. त्यासाठी आमदार निधीचे पाठबळ मिळाल्याने नव्या योजना साकारण्याची तयारी झाली असून पर्यटनमंत्री राम शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. त्यानुसार आता पूर्व दरवाजासमोरील प्लाझा अंतर्गत रामबागेपासून ते पूर्व दरवाजापर्यंत नेवासा येथील दगडाचे फ्लोरिंग बनविणे तसेच उद्यानातील रेलिंग व संरक्षक भिंत काढून लॅण्डस्केपिंग करण्यात येणार आहे. बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत आराखड्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच आमदार सानप यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पांडुरंग बोडके, गिरीश पुजारी, मंडलेश्वर काळे, अ‍ॅड. अजय निकम, मंदार जानोरकर, वैभव पुजारी, डॉ. एकनाथ कुलकर्णी, अ‍ॅड. ओमप्रकाश लोयार, धनंजय पुजारी व अतुल वडगावकर यांनी त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)