शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक  शहरातील तपमानाचा पारा चाळीस अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:41 IST

शहरातील तपमानाचा पारा पुन्हा चाळीस अंशांवर स्थिरावला असून, सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिसत असले तरी अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे.

नाशिक : शहरातील तपमानाचा पारा पुन्हा चाळीस अंशांवर स्थिरावला असून, सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिसत असले तरी अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे. दुपारी उन्हाच्या झळांसोबत जाणवणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. शनिवारी ४०.३ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाल्यानंतर सोमवारी (दि. १६) कमाल ३९.७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाल्याने तपमानाचा पारा चाळिशीत स्थिरावल्याचे दिसत असून, दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वाहनांसह नागरिकांची वर्दळही विरळ झाल्याचे दिसून येत आहे.  शहरातीले उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकचे तपमान नेहमीच कमी नोंदवले जात असल्याने सामान्यत: तपमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे तपमान सरकले तरी नाशिककरांना उन्हाचा त्रास जाणवू लागतो. त्यात यावर्षी मे महिन्यात सातत्याने तपमानाचा पारा ४०अंश सेल्सिअसपर्यंत राहिल्याने नाशिककरांना यावर्षी उष्णतेचा चांगलाच चटका सोसायला लागला असून, अजूनही उष्ण तपमानासोबतच उकाडाही वाढला असल्याने शीतपेयांसह, थंड फळांना मागणी वाढली आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक काळजी घेताना दिसून येत आहे. अनेकजण दुपारच्या वेळी अति महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळही विरळ झाल्याचे दिसत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्येही दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. घरातून बाहेर पडताना तोंडाला कपडा बांधून व अंगभर कपडे घालून बाहर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Temperatureतापमान