शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तपमानाने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:17 IST

यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून, मे महिन्यात ४५ अंशापर्यंत वाढले आहे. या वाढत्या तपमानामुळे घामाने चिंब झालेल्या सर्वांना केव्हा पाऊस पडेल असे झाले आहे.

मालेगाव : यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून,मे महिन्यात ४५ अंशापर्यंत वाढले आहे. या वाढत्या तपमानामुळे घामाने चिंब झालेल्या सर्वांना केव्हा पाऊस पडेल असे झाले आहे.सकाळी ८ वाजेपासून उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाची दाहकता वयोवृद्ध व लहान बालकांबरोबरच सर्वांना असह्य झाले आहे, यामुळे अनेकांना उष्णतेच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. या बदलत्या व वाढत्या तपमानामुळे इतर आजारांनी डोके वर काढले आहे. साहजिकच परिसरातील सर्व शासकीय व खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. वाढलेल्या तपमानामुळे उलटी, मळमळ, ताप, सर्दी, खोकला आदी विकारांसह अंगावर पुरळ येणे, यासारख्या आजारांची लागण होताना दिसत आहे. या विकारांमुळे रुग्णांना प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत आहे. असह्य अशा उकाड्याने सर्वांनाच घामाच्या धारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्वचेचे आजारही उद्भवत आहेत. मानेवर, पाठीवर, डोक्यावर तसेच हातापायांवर घामामुळे पुरळ येत असून त्वचा कोरडी पडणे, अंगाला खाज येणे, शरीराच्या अवघड भागात गाठी येणे असे विकार डोकावत आहेत.  वाढत्या उन्हामुळे सर्वच मंडळी स्वत:चा बचाव करण्यासाठी व उष्णतेची तीव्रता कमी होण्यासाठी जास्तीत जास्त शीतपेये घेताना दिसत आहेत; मात्र घातक अशा शीतपेयांमुळे घसा सुजणे, खवखवणे, सर्दी यांसारख्या आजारांना आमंत्रण देत आहे.अनेक भागात अघोषित संचारबंदीसकाळी ८ वाजेपासून सूर्यदेव आग ओकण्यास सुरुवात करत असून हा सूर्याचा प्रकोप दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत वाढता राहतो. त्यानंतर मात्र तपमानात घट होण्यास सुरुवात होते. या वेळेत शहरातील अत्यंत गर्दीच्या ठिकाणीही सामसूम होत आहे. शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होत असून अनेक भागात अघोषित संचारबंदी लागत आहे. नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे मुख्य रस्ते वगळता इतर रस्ते ओस पडत आहेत.  यंदा तपमानात वाढ असली तरी लग्नसराईने नागरिकांना गावोगावी फिरावे लागत आहे, याचा परिणाम नागरिकांच्या स्वास्थ्यावर होत आहे. दूषित पाणी व झाडांची कमतरता भासत असल्याने लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान