लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना वेळ देत नसल्याने कौटुंबिक कलह वाढले आहेत. त्यामुळे घरातील ज्येष्ठांनी युवा पिढीसोबत जुळवून घ्यावे तर युवकांनी अहंकार दाराबाहेर काढून कुटुंबीयांशी चर्चा करावी, तेव्हाच घरात आनंद येईल, असे प्रतिपादन नेवासा संस्थानचे हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.येथील विजयनगर भागात अहिल्यादेवी होळकर वारकरी भवन लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित सप्ताह कीर्तनमहोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यावेळी मंडलिक काल्याच्या कीर्तनात मार्गदर्शन करीत होते.आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, युवानेते उदय सांगळे, नगरसेवक पंकज मोरे, श्रीकांत जाधव, रूपेश मुठे, प्रतिभा नरोटे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होेते. अहिल्याबाई होळकर यांनी राज्यभर शंकराची मंदिरे, पिण्याच्या पाण्याचे कुंड बनविले. आजही ही मंदिरे आणि कुंड त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत.अहिल्याबार्इंच्या नावाने सिन्नरसारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात वारकरी भवन उभे राहणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासारखे असल्याचे ह.भ.प. मंडलिक महाराज यांनी सांगितले.यावेळी उदय सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. महाप्रसादाने कीर्तनमहोत्सवाची सांगता करण्यात आली. दिंड्यांना हक्काचा निवारासिन्नरमध्ये वारकरी भवन उभे राहावे, अशी माझ्या मनात इच्छा होती. ती इच्छा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे, आमदार रूपहरी रूपनवर तसेच नगर परिषद यांच्या सहकार्याने पूर्ण झाली. सिन्नरला वर्षभर अनेक दिंड्या मुक्काम करून मार्गस्थ होतात. वारकरी भवनच्या निमित्ताने सर्वांना हक्काचा निवारा मिळाल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले.
सिन्नर येथे कीर्तनमहोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:56 IST
सिन्नर : तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना वेळ देत नसल्याने कौटुंबिक कलह वाढले आहेत. त्यामुळे घरातील ज्येष्ठांनी युवा पिढीसोबत जुळवून घ्यावे तर युवकांनी अहंकार दाराबाहेर काढून कुटुंबीयांशी चर्चा करावी, तेव्हाच घरात आनंद येईल, असे प्रतिपादन नेवासा संस्थानचे हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
सिन्नर येथे कीर्तनमहोत्सवाची सांगता
ठळक मुद्देकीर्तनमहोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली.