शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चंदनपुरीतील खंडोबा महाराज यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:37 IST

चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराज यात्रेची बुधवारी सांगता झाली. मंदिरातून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मूर्ती मुखवटांची पूजा करण्यात आली. पूजा व आरती जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील व बापू अहिरे यांनी केली.

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराज यात्रेची बुधवारी सांगता झाली. मंदिरातून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मूर्ती मुखवटांची पूजा करण्यात आली. पूजा व आरती जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील व बापू अहिरे यांनी केली.भंडारा व खोबऱ्याची उधळण आणि मंदिर परिसरात येळकोट-येळकोट जय मल्हारचा गजर करीत सवाद्य पालखी मिरवणूक काढून मुखवटे घरी नेण्यात आले. साहेबराव सूर्यवंशी यांच्या घराजवळ महापूजा व महाप्रसाद झाला. मिरवणुकीनंतर कौतिक अहिरे यांच्या घरी मुकुट ठेवण्यात आला. गेल्या आठवड्यात यात्रेसाठी येणाºया भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली. सुमारे ५५ हजार भाविकांनी यात्रेत हजेरी लावली. मुखवटे वर्षभर आहिरे यांच्या घरी राहतील. यात्रोत्सव सुरू झाल्यानंतर १२ दिवस मंदिरात देवाचे मुखवटे ठेवले जातात. प्रसाद, फुलहार, शेव रेवडी, सौंदर्यप्रसादणे, पाळणे, खेळणी व मनोरंजनाची साधने आदि दुकाने रविवार पर्यंत सुरू राहतील. खंडेराव महाराज, म्हाळसा व बाणूबाईचे मुखवटे घरी नेण्यात आली असून तरी यात्रा चार-पाच दिवस सुरू राहते. यात्रोत्सव काळात मोठ्या प्रमाणात भंडारा व खोबºयाची उधळण करण्यात आली. यात्रेत सुमारे नऊशेहून अधिक दुकाने थाटली गेली होती. दररोज लाखो रुपयांची उलाढाल झाली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे