अटलबिहारी वाजपेयी यांचं अल्पमतातील सरकार आठवतं? अवघं तेरा दिवसांचं हे सरकार अवघ्या एका मतानं पडलं आणि मग खूपच चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अटलजींचे फोटो असलेले पोस्टर करून ‘काय गुन्हा या माणसाचा?’ असा सवाल करीत लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. आता भाजपने तिकीट कापल्याने दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी करणाºया एका उमेदवाराने हाच फंडा सुरू केला आहे. आपण विरोधी पक्षाचे उमेदवार आहोत त्यामुळे सरकारवर टीका केली पाहिजे हे राज्यस्तरीय मुद्दे सोडून या उमेदवाराने सांगा ना काय चुकलं ? अशाप्रकारचा व्हिडीओ प्रचार सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यात अनेक प्रश्न करून शेवटी एकच प्रश्न सांगा ना काय चुकलं... असा प्रश्न केला जातो. मग त्याचे प्रतिस्पर्धीही बहाद्दर! त्यांनीदेखील सोशल मीडियावर त्याला तोडीस तोड उत्तर देणे सुरू केले आहे. होय चुकलंच आमचं... १९९७ मध्ये नगरसेवक केलं! होय चुकलं आमचंच महापौर केलं ते... होय चुकलंच आमचं... आमदार केलं ते... चुकलंच आमचं शहराध्यक्ष केलं ते... अशा प्रकारच्या उत्तरांमुळे आता सोशल मीडियावर चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. त्यातूनच उमेदवाराने पक्षांतर केल्यामुळे त्याचा रागही कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता संबंधित उमेदवार काय बोलणार... याकडे लक्ष लागून आहे.
सांगा ना, यांचं काय चुकलं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 01:19 IST
आता भाजपने तिकीट कापल्याने दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी करणाºया एका उमेदवाराने हाच फंडा सुरू केला आहे. आपण विरोधी पक्षाचे उमेदवार आहोत त्यामुळे सरकारवर टीका केली पाहिजे हे राज्यस्तरीय मुद्दे सोडून या उमेदवाराने सांगा ना काय चुकलं ? अशाप्रकारचा व्हिडीओ प्रचार सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
सांगा ना, यांचं काय चुकलं...
ठळक मुद्देभटक्या