पंचवटी : पेठरोडवरील एस टी कार्यशाळेशेजारी असलेल्या भारत संचार दूर निगम (टेलिफोन) एक्सचेंजच्या विद्युत जनित्र रूमला आग लागून डिझेल टॅँक, रेडियेटर, मशिनरी व वायर्स जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहीती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दुपारी पावणे एक वाजेच्या सुमाराला ही घटना घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही मात्र विद्युत रोहित्र खोलीतील यंत्रसामुग्री जळाल्याने अंदाजे सात ते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सदरची आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
टेलिफोन एक्सचेंजच्या विद्युत जनित्राला आग
By admin | Updated: April 7, 2017 15:40 IST