शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:10 IST

इगतपुरी तालुक्यातील वांजोळे येथील एका युवकाने गावातील काही संशयित व्यक्तींकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने, सर्व गावकºयांसमक्ष चौकात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वांजोळे येथील एका युवकाने गावातील काही संशयित व्यक्तींकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने, सर्व गावकºयांसमक्ष चौकात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. दरम्यान, शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाºया सर्व संशयितांना अटक करावी, अशी मागणी करीत नातलगांनी जोपर्यंत सर्व संशयितांना अटक केलीं जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आणि अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नातलगांनी मृतदेहावर आज दुपारनंतर अंत्यसंस्कार केले.दरम्यान, याबाबत विजय पालवे यांच्या नातलगांनी दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला होता. यांपैकी नऊ जणांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र उर्वरित दोन फरार संशयितांना अटक करावी अशी मागणी मृतांच्या नातलगांनी लावून धरीत, जोपर्यंत फरार दोघाना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यासमोर चार तास ठिय्या मांडला. अखेर घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी संतप्त नातलगांची समजूत घालीत मध्यस्थी करीत मृतदेह नातलगांच्या ताब्यात देऊन पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी वांजोळे गावात कमांडो पथकासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत घोटी पोलिसांनी दत्तू रामभाऊ बलय्या, कल्पना दत्तू बलय्या, संदीप दत्तू बलय्या, काळू रामभाऊ बलय्या, शोभा काळू बलय्या, सागर काळू बलय्या, चेतन काळू बलय्या, राहुल काळू बलय्या, वाळू रामभाऊ बलय्या, शारदा सुनील बलय्या व ताई वाळू बलय्या या संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, यातील काळू व सागर हे बापलेक फरार आहेत. दरम्यान, या दोन्ही फरार संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक गुन्हा शाखेची मदत घेतली आहे. असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद नविगरे, संदीप शिंदे आदी करीत आहेत.