शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

By admin | Updated: May 22, 2015 22:48 IST

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सहकारी तीन मंत्र्यांसमवेत हेलिकॉप्टरने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टरमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी करण्याबरोबरच, हेलिकॉप्टरची अनेकवार चाचणी घेतल्यानंतर काही काळाने मुख्यमंत्री कोल्हापूरकडे सुखरूप रवाना झाले. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दिंडोरी रोडवरील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे व पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे शासकीय हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदवीदान समारंभासाठी रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमानुसार दुपारी अडीच वाजता पोलीस परेड मैदानावरून त्याच शासकीय हेलिकॉप्टरने कोल्हापूरकडे रवाना होणार असल्यामुळे दिंडोरी रोडवरील हेलिकॉप्टर परेड मैदानावर उतरविण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री व सहकारीमंत्री कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने रवाना होण्यासाठी बसले असता, जमिनीपासून काही फूट उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर पुन्हा उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरच्या पायलटने त्यातील तांत्रिक दोष दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु प्रत्येक वेळी हेलिकॉप्टर उडाण घेऊन पुन्हा जमिनीवर उतरविण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याच्या वृत्ताने शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. पर्यायी व्यवस्था म्हणून ओझर विमानतळावर संपर्क साधून विशेष विमानाची व्यवस्था करता येते काय याचीही चाचपणी करण्यात आली, तर दुसरीकडे हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुमीत वानखेडे व त्यापाठोपाठ जलसंपदामंत्री महाजन यांना उतरविल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न करण्यात आला. त्यात ते यशस्वी ठरले. याच दरम्यान, ओझरच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर चालकाशी संपर्क साधून तांत्रिक बिघाडाबाबत माहिती घेतली असता, त्यांनी ‘ओके’ असल्याचा निर्वाळा दिल्यावर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.