नाशिक : विविध क्षेत्रांतील दीड कोटी व त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापारी आणि उद्योजकांना २० जानेवारीपर्यंत जीएसटीआर-३ बी रिटर्न भरणे आवश्यक असल्याने सोमवारी (दि.२०) अचानक जीएसटीच्या पोर्टलवर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे जीएसटीचा सर्व्हर डाउन होऊन जीएसटीआर तीन भरण्याच्या प्रक्रियेत विलंब होत आहे.त्यामुळे जीएसटी भरणारे उद्योजक, व्यापारी व कर सल्लागारांकडून जीएसटीआर ३ बी सादर करण्यासाटी मुदवाढ मिळावी अन्यथा विलंबामुळे आकारण्यात येणारा दंड माफ करावा, अशी मागणी होत आहे. जीएसटी परिषदेने दीड कोटी व त्याहून अधिक उलाढाल असलेल्या व्यापारी व उद्योजकांना दिलासा देत मासिक जीएसटी भरण्याच्या त्रासातून दिलासा देत त्रैमासिक परतावा भरण्याची सवलत दिली आहे. त्यामुळे व्यावसायिकांडून तिसºया तिमाहीतील परतावा भरण्यासाठी अखेरचा दिवस असल्याने सोमवारी जीएसटी भरण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जीएसटी पोर्टल संथगतीने प्रतिसाद देत असल्याने अनेकदा प्रयत्न करूनही रिटर्न भरला जात नसल्याचे कर सल्लागार राजेंद्र बकरे यांनी सांगितले, तर काही व्यापाऱ्यांनी जीएसटी पोर्टलवरून ओटीपी मागविले जात असून, नव्याने नोंदणीसाठी एसएमस प्राप्त होत असल्याचे सांगितले. यासंदर्भात नाशिक प्रादेशिक जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधला असता नियमित जीएसटी रिटर्न भरताना कोणतीही समस्या येत नसल्याचे येथील अधिकाºयांनी स्पष्ट केले.
जीएसटीआर-३ भरताना तांत्रिक अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:15 IST
विविध क्षेत्रांतील दीड कोटी व त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापारी आणि उद्योजकांना २० जानेवारीपर्यंत जीएसटीआर-३ बी रिटर्न भरणे आवश्यक असल्याने सोमवारी (दि.२०) अचानक जीएसटीच्या पोर्टलवर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे जीएसटीचा सर्व्हर डाउन होऊन जीएसटीआर तीन भरण्याच्या प्रक्रियेत विलंब होत आहे.
जीएसटीआर-३ भरताना तांत्रिक अडचणी
ठळक मुद्देमुदतवाढ मिळण्याची मागणी : सर्व्हर डाउन असल्याने रिटर्न भरण्यास विलंब