शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरसह ४१ गाव पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:06 IST

येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे.

ठळक मुद्दे१६५ कोटी निधी उपलब्ध : लवकर प्रशासकीय मान्यता मिळणार

येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे.सातत्याने दुष्काळग्रस्त असणाऱ्या तालुक्यातील राजापूर भागातील टंचाईग्रस्त गावांची टंचाईतून मुक्तता करण्यासाठी सदरची योजना गेल्या तीन-चार वर्षापासून मंजुरीच्या पातळीवर आहे. लवकरच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे पुढील आठवड्यामध्ये प्रशासकीय मान्यता देऊन सदरील योजनेला मंजुरी देणार आहेत. सदरील पाणीयोजनेसाठी पाणी नांदूरमधमेश्वर धरणातून उचलले जाणार असून ते शुद्धिकरणासाठी पन्हाळसाठे येथे फिल्टरेशन प्लांट झाल्यानंतर सदरील पाणी ग्रॅव्हिटीद्वारे राजापूरसह ४२ गाव योजनेतील गावांना जाणार आहे. नुकताच या योजनेचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडा सन २०१८-२०१९ मध्ये करण्यात आलेला आहे. सदर योजनेची कृती आराखड्याप्रमाणे अंदाजित किंमत १६५ कोटी एवढी आहे.या गावांना मिळणार फायदासदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बु, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव, गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. डोंगरी भागातील ही गावे टंचाईग्रस्त असून यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. सदरची योजना झाल्यास संपूर्ण तालुका टँकरमुक्त होऊ शकणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकारwater transportजलवाहतूक