‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अंबड येथील मुख्य कार्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी कोरोना काळातील शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहाविषयी विविध विषयांवर त्यांनी मत मांडले. तत्पूर्वी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना नितीन उपासणी यांनी कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भौतिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांवर दडपण वाढण्याची भीती व्यक्त करतानाच पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत शिक्षणासह विविध विषयांवर संवाद साधत त्यांचे समुपदेशन करण्याचा सल्लाही दिला. कोरोना संकटात शाळा बंद असल्या तरी शिक्षकांचे अध्यापनाचे काम सुरूच असल्याचे नमूद करताना भौतिक सुविधांमुळे ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात सामाविष्ट होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक त्यांच्या भागात जाऊन गटागटाने शिकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातही मोठा बदल झाला असून, दुरस्थ शिक्षणाचे महत्त्व वाढल्याचे नमूद करताना मागील दीड वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांची खरोखरच गरज उरली आहे का अशी स्थिती निर्माण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसाथ करणारे विद्यार्थीही तांत्रिकदृष्ट्या गतिमान झाले आहे. त्यामुळे शिक्षकांनीही अधिक गतिमान होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
इन्फो-
लोकमत मंचावरून निराधार विद्यार्थिनींना मदत
कोरोनामुळे पालक हिरावले गेलेल्या दिशा सोनवणे या विद्यार्थिनीने ‘लोकमत’ला पाठवून तिच्या समोर असलेली शालेय शुल्काची अडचण मांडली होती. तिच्या अडचणीची ‘लोकमत’ने संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांनाही कल्पना दिली असता त्यांनी तत्काळ दिशासोबत फोनवरून संवाद साधत तिला धीर दिला. तसेच संबंधित शाळेच्या विश्वस्थांना फोन करून दिशा व तिच्या पाचवीतील बहिणीचे संपूर्ण शुल्क तत्काळ माफ करून या दोन्ही विद्यार्थिनींना दिलासा दिला.
इन्फो-
मुलांशी पालकांचा संवाद गरजेचा
शालेय विद्यार्थ्यांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्यात होणार शारीरिक व मानसिक बदल लक्षात घेऊन पालकांनी मुलांसोबत खुलेपणाने संवाद साधण्याची गरज आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, इंटरनेटशी जोडली गेलेली मुले इतर अनावश्यक बाबींकडेही आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या अशा गोष्टींकडे लक्ष ठेवून त्यांचे सखोल समुपदेशन करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
त्यांच्या शारीरिक वाढीसंदर्भात खुलेपणाने त्यांचे व त्यांच्या शारीरिक वाढीसंदर्भात खुलेपणाने संवाद साधत आहेत.
030721\03nsk_39_03072021_13.jpg
नितिन उपासनी