शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पहिल्या दिवशी शिक्षकांचीच शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:59 IST

मालेगाव : दरवर्षी १५ जून रोजी शालेय शैक्षणिक वर्ष सुरू व्हायचे; पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. मात्र यावर्षी काही ठिकाणी शाळा उघडल्या असल्या तरी केवळ शिक्षकांचीच उपस्थिती होती, विद्यार्थी मात्र घरीच होते. त्यामुळे शाळेची घंटा वाजलीच नाही.

मालेगाव : दरवर्षी १५ जून रोजी शालेय शैक्षणिक वर्ष सुरू व्हायचे; पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. मात्र यावर्षी काही ठिकाणी शाळा उघडल्या असल्या तरी केवळ शिक्षकांचीच उपस्थिती होती, विद्यार्थी मात्र घरीच होते. त्यामुळे शाळेची घंटा वाजलीच नाही.शालेय कामकाजाच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या उत्साहात पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांना वाजतगाजत शाळेत दाखल केले जाते, त्यांचा यशोचित सत्कार, फुले देऊन गोडधोड खायला देऊन पहिल्या दिवशी स्वागत केले जायचे; पण कोरोनाच्या भीतीमुळे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. शासनाने शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करायच्या सूचना केल्या मात्र त्याबाबत कोणत्याही गाइड लाइन दिल्या नाहीत यामुळे शिक्षकच संभ्रमावस्थेत आहेत. मालेगाव तालुका कोरोनामुळे रेडझोनमध्ये असून, शिक्षकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज शाळेचा पहिला दिवस म्हणून शिक्षक सकाळी शाळेमध्ये गेले; परंतु त्यांनी आॅफलाइन काम केले.शाळेत एकतर विद्यार्थी नाहीत. शासन आॅनलाइन काम करायला सांगते. ग्रामीण भागात इंटरनेटची रेंज मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांपुढे अनेक प्रश्न उभे आहेत. नॉनटीचिंग कर्मचाऱ्यांनी शाळा उघडल्या, शिक्षकही आले आणि आॅफलाइन काम करून घरी परतल्याने तालुक्यातील शाळा विद्यार्थ्यांअभावी बंदच होत्या. शासकीय आदेशाने पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके शालेय विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित असताना सर्व ठिकाणी ते पोहोचू शकले नाहीत. हॉटस्पॉट ठिकाण असल्यामुळे ते शक्य झाले नाही.पहिल्याच दिवशी शाळेत जावे लागेल म्हणून तालुक्यातील बहुतेक शाळांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळत स्वच्छताही केली; परंतु शासकीय आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला व पहिल्या दिवशी साजरा होणारा प्रवेशोत्सव रद्द झाला.------------------------------------विद्यार्थ्यांना अभ्यास कसा द्यावा, कसा करून घेता येईल याचे रितसर पत्र शासन स्तरावरून आल्यावर शिक्षक अध्ययन अध्यापनास सुरुवात करतीलच; परंतु दरवर्षी शाळेतला आठवणीतला पहिल्या दिवसास विद्यार्थी यावर्षी मुकले हे तितकेच खरे.

-----------------------------------कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आदेशनुसार दरवर्षी १५ जूनला उघडणाºया शाळा, आज विद्यार्थ्यांअभावी होत्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय, अतिशय योग्य आहे, कारण आधी आरोग्य महत्त्वाचे, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान झाले नाही. नवीन शैक्षणिक वर्ष हे १ जुलैनंतरच सुरू होते आणि शिक्षक वर्क फ्रॉर्म होम घरून करतच आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. तसेच पालकसुद्धा आपल्या पाल्याच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहेत.-संगीता चव्हाण, शिक्षिका, सर्वोदय शिक्षण संस्था प्राथमिक शाळा, मालेगाव

टॅग्स :Nashikनाशिक