शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शिक्षकांना दोन टप्प्यात वेतन? शालार्थ प्रणाली : शासनाकडून मार्गदर्शनाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 27, 2014 01:03 IST

नाशिक : राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांना आता शालार्थ संगणक प्रणालीद्वारे वेतन दिले जाणार आहे. तथापि, शिक्षण मंडळातील शिक्षकांचे निम्मे वेतन महापालिका अदा करीत असल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शनाची संबंधितांना प्रतीक्षा आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांना आता शालार्थ संगणक प्रणालीद्वारे वेतन दिले जाणार आहे. तथापि, शिक्षण मंडळातील शिक्षकांचे निम्मे वेतन महापालिका अदा करीत असल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शनाची संबंधितांना प्रतीक्षा आहे.राज्यातील अनुदानित आणि शासकीय प्राथमिक, तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन विलंबाने होत असते. दर महिन्याला शाळांकडून देयके सादर झाल्यावर ती शिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर वेतन दिले जात असले तरी त्यासाठी निश्चित तारीख नसते. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी शिक्षण विभागाने शालार्थ प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला होणार आहे. महापालिका शिक्षण मंडळातील सुमारे एक हजार शिक्षकांच्या बाबतीत मात्र काहीशी वेगळीच अडचण झाली आहे. शिक्षण मंडळातील शिक्षकांचे निम्मे वेतन राज्यशासन तर उर्वरित निम्मे वेतन महापालिकेच्या निधीतून होते. शालार्थ प्रणाली राबविल्यानंतर शासनाचा हिस्सा बॅँकेत जमा होईल. परंतु महापालिकेच्या वतीने दिले जाणारे निम्मे (५० टक्के) या प्रणालीत जमा होणार नाही. ते स्वतंत्ररीत्या जमा होईल. महापालिका आणि शासन यांची एकाच वेळी रक्कम जमा न झाल्यास शिक्षकांना दोन टप्प्यात वेतन करावे लागेल, असे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. शासनाला निर्णय घ्यावा लागेलकेवळ नाशिक महापालिकाच नव्हे तर राज्यातील अन्य महापालिकांचा हा प्रश्न आहे. त्याच बरोबर अनेक शाळांना ९० टक्के शासनाकडून तर दहा टक्के संबंधीत संस्थेला खर्च करावे लागतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला अशा प्रकारच्या दोन आस्थापनांकडून ज्या शिक्षक आणि शिक्षकेतरांचे वेतन होत आहे, त्यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, असे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.