कनाशी : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या विधायक मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने वर्षभरात अनेक आंदोलने केली तसेच मागण्यांचा पूर्ततेकरिता शासनास निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. वाढीव मंजूर पदांना तातडीने वेतन सुरू करणे, सन २०१२-१३ मधील नियुक्त शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता व वेतन देणे, कायम विनाअनुदान तत्त्वावरील मूल्यांकनपात्र तुकड्यांना अनुदान देणे, माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करणे, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करणे, तुकडी टिकवण्याचे निकष शिथिल करणे व इतर अनेक प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.बारावीच्या विद्यार्थ्यांनी कोणताही मानसिक ताण न घेता चांगला अभ्यास करून परीक्षा द्यावी. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस अनिल महाजन, प्रा. आर. एन. शिंदे, प्रा. डी. जे. दरेकर, प्रा. डी. एम. कदम, प्रा. टी. व्ही. ढोली, प्रा. रामदास निकम, प्रा. पी. आर. पवार आदिंनी दिला आहे. (वार्ताहर)
बारावीच्या बोर्ड पेपर तपासणीत शिक्षकांचा असहकार
By admin | Updated: February 14, 2016 23:26 IST