शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:51 IST

: राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन केले. प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वयक समतीतर्फे शनिवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय बंद असल्याने, प्रवेशद्वारावर पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी संघटनांचे निवेदन स्वीकारले.

नाशिक : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन केले. प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वयक समतीतर्फे शनिवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय बंद असल्याने, प्रवेशद्वारावर पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी संघटनांचे निवेदन स्वीकारले.  शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास गोल्फ क्लब येथून शिक्षकांच्या मोर्चास सुरुवात झाली. त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, शालिमार, नेहरू चौक, एम.जी. रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चाच्या सुरुवातीस महिला शिक्षिका होत्या. त्यानंतर पुरुष शिक्षक होते. २३ आॅक्टोबरचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा यांसह मागण्यांच्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. शासकीय सुटी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय बंद होते. त्यामुळे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संघटनांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवून निवेदन देण्यास  सांगितले.  संघटनांच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना सादर केले. निवेदनातील मागण्यांमध्ये  मोर्चाचे नेतृत्व राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक काळूजी बोरसे, अंबादास वाजे, भरत शेलार, राजेंद्र म्हसदे, विठ्ठल धनाईत, केदू देशमाने, आर. के. खैरनार, संजय पगार, आनंदा कांदळकर, केदराज कापडणीस, अंबादास आहिरे, सुभाष अहिरे, अर्जुन भोये, मोतीराम नाठे, राजेंद्र दिघे, शांताराम बधान, अकबर शेख, सोपान गंभिरे, अनिल जगताप, प्रकाश लोखंडे, प्रकाश सोनवणे, पांडुरंग कर्डिले, राजेंद्र नांदूरकर, गोरख देवडे आदी उपस्थित होते.आमदारांनी साधला संवादमोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झाली. तेथे आमदार डॉ. सुधीर तांबे, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, जयवंत जाधव यांनी शिक्षकांच्या मागण्यांना खुला पाठिंबा दिला. चारही आमदारांनी मोर्चातील आंदोलकर्त्यांशी संवाद साधत शिक्षकांच्या मागण्यांबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत काढलेला आदेश रद्द करावा, डाटा आॅपरेटरची नेमणूक करावी, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, अन्यायकारक बदली आदेशात सुधारणा करून मे २०१८ मध्ये बदल्या कराव्यात, संगणक परीक्षेसाठी मे २०१८पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला.