शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी केला आॅनलाइनचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:38 IST

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत वेळापत्रक ठरवून दिले असून, शक्यतो पुढच्या महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असले तरी, जिल्हा परिषदेच्या २१४ शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकविण्यास सुरुवात केली आहे, तर ६० शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे.

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत वेळापत्रक ठरवून दिले असून, शक्यतो पुढच्या महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असले तरी, जिल्हा परिषदेच्या २१४ शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकविण्यास सुरुवात केली आहे, तर ६० शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे.स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ज्या शिक्षकांना शक्य आहे त्यांनी स्वयंप्रेरणेने आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय कामकाज सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक ठरवून दिले असून, त्यानुसार निम्मे शैक्षणिक सत्र संपुष्टात येण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. जिल्हा परिषदेच्या शाळादेखील बंद असून, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ते टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन साधारणत: चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे. या उपक्रमास पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळाले असून, शिक्षकांच्या या स्वयंप्रेरणेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षण अधिकारी वैशाली वीर यांनी कौतुक केले आहे.-------------------विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गतीबागलाण १२, दिंडोरी १२१ इगतपुरी १, मालेगाव ५, नाशिक ५, निफाड १६, येवला ३० असे एकूण १९० शिक्षकांचा सहभाग आहे.६० शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीचा ग्रुप करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक