शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
6
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
7
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
8
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
9
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
10
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
11
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
12
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
13
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
14
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
15
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
16
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
18
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
19
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
20
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 15:26 IST

इगतपुरी : अशैक्षणिक कामातुन वगळण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

इगतपुरी : अशैक्षणिक कामातुन वगळण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका नेते जनार्दन कडवे व तालुकाध्यक्ष सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना निवेदन देण्यात आले.प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती आणि कर्तव्यच मुळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांची बांधिलकी आहे. बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा २०९९ मधील कलम २७ चा विचार करता शिक्षकांच्या सेवा कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी असु नये हे अभिप्रेत असतांना सुध्दा प्रशासकीय यंत्रणा कायद्यातील अपवादात्मक तरतुदींचा विपर्यास करत शिक्षकांना अशैक्षणकि कामे करण्यास भाग पाडतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना निवडणूक यंत्रणेने बीएलओ म्हणुन नियुक्ती केल्यापासुन वर्षभर अनेक शिक्षक या कामात गुंतुन असुन मतदार यादी पुर्नरिक्षण व निवडणूक विषयक कामाच्या सतत चालणाऱ्या प्रक्रियेमुळे शाळेतील अध्यापन कार्य प्रभावित होत आहे. या सोबतच अन्य अशैक्षणिक कामे सुद्धा अनेक प्रसंगी दिले जातात. न्यायालयाने शिक्षकांना बीएलओ म्हणुन काम करण्याची सक्ती करता येणार नाही तसेच काम करण्यास नाकारणाºया शिक्षकांवर कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश देऊनही यंत्रणा बळजबरीने आणि लोकप्रतिनिधी कायद्याचा अनाकलनीय धाक दाखवत आहे. म्हणुन शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.या प्रसंगी सुनील भामरे, प्रकाश सोनवणे, निवृत्ती नाठे, वैभव गगे, प्रशांत वाघ, सुनील सांगळे, विनता धोती, मोनाली देशमुख, मंजुषा अिहरे, गणेश भामरे, जगन्नाथ बिरारी, योगेश भामरे, पराग कोकणे, सौरभ अिहरराव, शिवाजी थेटे, दिशा सोनवणे, नंदा शिरसाठ, सुहास रकिबे, अल्का भारंबे, मनिषा चौधरी, चेतना गावित, माणिक भालेराव आदी शिक्षक समतिीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक