शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

शैक्षणिक प्रश्नांवर भरणार ‘शिक्षक दरबार’

By संदीप भालेराव | Updated: August 20, 2018 01:32 IST

नाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक प्रश्नांवर शिक्षण विभागात सातत्याने शिक्षकांना चकरा माराव्या लागत असल्याने असे प्रश्न निकाली काढण्यासाठी दि. २३ रोजी नाशिकमध्ये प्रथमच उत्तर महाराष्टÑातील ‘शिक्षक दरबार’ भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदराडे यांचा पुढाकार : उत्तर महाराष्टÑातील शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार

नाशिक : शिक्षण क्षेत्रातशिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक प्रश्नांवर शिक्षण विभागात सातत्याने शिक्षकांना चकरा माराव्या लागत असल्याने असे प्रश्न निकाली काढण्यासाठी दि. २३ रोजी नाशिकमध्ये प्रथमच उत्तर महाराष्टÑातील ‘शिक्षक दरबार’ भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शासनदरबारी आणि शिक्षण विभागात शिक्षकांची अनेक प्रकरणे आणि प्रश्न पडून आहेत. यासाठी शिक्षक आणि शिक्षक संघटनांना प्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठवावे लागतात. जिल्हा पातळीवरील विषय तेथेच मिटविणे अपेक्षित असताना विनाकारण शिक्षण उपसंचालक, संचालक कार्यालयाकडे शिक्षकांना चकरा माराव्या लागतात. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने या प्रश्नांना किमान चालना मिळावी आणि सोडवणूकही व्हावी यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शिक्षकांना आपल्या अडीअडचणी मांडण्याची संधी मिळणार आहे.विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यासह सर्व जिल्ह्यांतील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, वेतन पथक, अधीक्षक, नाशिक बोर्डाचे अध्यक्ष तसेच इतर अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार दराडे हे शिक्षकांचे प्रश्न ऐकून ते सोडविण्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणार असून, तत्काळ निर्णय घेण्याबाबत दरबारात प्रयत्न केले जाणार आहेत. जे प्रश्न उपसंचालक पातळीवरचे आहेत त्यासाठी स्वतंत्र बैठक, संचालक पातळीवरचे असतील तर त्यांच्याशी चर्चा आणि त्यानंतरही निर्णय न मिळाल्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे गाºहाणे मांडले जाईल. फारच गरज निर्माण झाल्यास प्रसंगी मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक