शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघटनांच्या आॅनड्यूटी अधिवेशनाला ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:14 IST

पेठ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थेतील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या आॅनड्यूटी अधिवेशनाला महाराष्ट्र ...

ठळक मुद्देशासन निर्णय : दीर्घ सुटीच्या कालावधीत अधिवेशन घेण्याच्या सूचना

पेठ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थेतील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या आॅनड्यूटी अधिवेशनाला महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने ब्रेक लावला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा व राज्यस्तरीय अधिवेशन दीर्घ सुटीच्या कालावधीत आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत.राज्यात विविध व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालये व अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना कार्यरत असून, दर तीन वर्षांनी संघटना पातळीवर अधिवेशन घेण्यात येते. यामध्ये सहभाग घेण्यासाठी शासनाकडे विशेष नैमित्तिक रजेची मागणी करण्यात येत असते. यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊन शाळा ओस पडत असतात. याबाबत पालक, शिक्षणतज्ज्ञ व प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर टीका-टिप्पणीही केली जाते.अशा आहेत शासनाच्या सूचनासदर संघटना शासनमान्यता प्राप्त असावी. अधिवेशन हे फक्त अशैक्षणिक (दीर्घ सुट्टीमध्ये) कालावधीमध्येच घेण्यात यावे,अधिवेशन आयोजित करण्यासाठी संबंधित शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय / माध्यमिक व उच्च माध्यमिकशिक्षण संचालनालय) यांची पूर्व परवानगी घ्यावी, शैक्षणिक कामकाज सुरु असताना अधिवेशनास परवानगी दिल्याने सदर अधिवेशनाला शिक्षक मोठ्या प्रमाणावर हजर राहिल्यास सदर कालावधीत शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.यास्तव दीर्घ सुट्टी व्यतिरिक्त इतर कालावधीत सदर अधिवेशन आयोजन करण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये. तसेच असे प्रस्ताव शासनमान्यतेकरितादेखील सादर करू नयेत. शासन स्तरावर असे प्रस्ताव सादर केल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही.शिक्षक संघटनांकडून आयोजित केलेले अधिवेशन, शिक्षण परिषद अथवा चर्चासत्र हा सुध्दा एक शैक्षणिक उपक्र म आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षणतज्ञांना निमंत्रित करून शिक्षकांचे उद्बोधन केले जाते. राज्य शासनातील विविध खात्यांचे मंत्री व सचिव शिक्षकांना या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. त्यामूळे संघटनांच्या अधिवेशनासाठी आॅन ड्यूटी रजा मिळावी.-अंबादास वाजे, राज्य कार्याध्यक्षमहाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ

टॅग्स :Teacherशिक्षक