शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची अन्नत्याग पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 18:41 IST

येवला : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत.

येवला : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत. नवयुग शिक्षक क्र ांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गजानन खैरे व अनिस कुरेशी यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे. बुधवारी औरंगाबाद येथून निघालेले हे शिक्षक सुरेगाव रस्ता (ता. येवला) येथे गुरुवारी, (दि.३०) रात्री मुक्कामी होते. राज्यातील शंभर टक्के अनुदानाला पात्र शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे शासन निर्णयानुसार अनुदान द्यावे, १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयातील घोषित, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक नैसर्गिक तुकड्यांना निधीसह प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे तसेच अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे या त्यांच्या मागण्या आहेत. मागण्या मान्य करून १५ ते १८ वर्षांपासून विनावेतन काम करत असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी विनंती आंदोलनकर्ते शिक्षक गजानन खैरे आणि अनिस कुरेशी यांनी शिक्षण विभागाला केली आहे.दरम्यान, अन्नत्याग दिंडीचा तिसरा दिवस असून, पायाला फोडं आली आणि तब्येत खालावली तरी आम्ही मागे हटणार नाही, असे सांगून शासन आश्वासने देते मात्र कृती करत नसल्याने अनेक शिक्षक वेतन नसल्याने रोजंदारी करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आणि राज्यातील ५० हजार शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी हे आंदोलन सुरू केल्याचे खैरे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक