शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिक्षकांच्या वेतनाची माहिती एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:00 IST

येवला : शिक्षकांना त्यांच्या पगाराची समग्र माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या पुढाकाराने तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने ‘ई सॅलरीबुक’ हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून, येवला तालुक्यातील शिक्षकांना एका क्लिकवर वेतनाची अद्ययावत माहिती मिळू लागली आहे.

येवला : शिक्षकांना त्यांच्या पगाराची समग्र माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या पुढाकाराने तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने ‘ई सॅलरीबुक’ हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून, येवला तालुक्यातील शिक्षकांना एका क्लिकवर वेतनाची अद्ययावत माहिती मिळू लागली आहे.येवला तालुक्यात जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची संख्या सातशेच्या वर आहे. शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीतून होते. दरमहा शिक्षकांना आॅफलाइन पगार स्लिप दिल्या जातात. परंतु काहींना वेळेवर पोहोच करताना बराच वेळ जात असे. याबाबत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांना काही तंत्रस्नेही शिक्षकांनी ई- सॅलरीबुक या अ‍ॅपबाबत सांगितले. आपल्या तालुक्यातही असा उपक्र म राबविण्याची परवानगी त्यांनी दिली. गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने सर्व केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने पगारबील अपलोड करण्याचे शिवधनुष्य जिल्हा परिषद शाळा एरंडगावचे मुख्याध्यापक कांगणे यांनी लीलया पेलले. आता तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना आपला पगार आपल्या मोबाइलवर पाहता येणार आहे. तसेच पीडीएफ डाऊनलोड करता येणार आहे.---------------------प्ले स्टोअरवरून घेता येईल अ‍ॅपप्ले स्टोअरवरून ई-सॅलरीबुक अ‍ॅप डाऊनलोड करु न सर्वांनी आपला पगाराचा तपशील आपल्या स्मार्टफोनवर माहे मार्च २०२० पासून आतापर्यंतचा पहायला मिळाल्याने सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी पंचायत समिती येवला येथील वरिष्ठ सहायक एस. आर. पाटील व एकनाथ घुले यांचे सहकार्य लाभले.----------------ई-सॅलरीबुक हे अ‍ॅप सर्व शाळा, कार्यालये वापरू शकतात. आपल्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर आपला पासवर्ड दिला असल्याने आपले वेतन आपल्यालाच पाहता येते. सर्व शिक्षकांना उपयोगी पडणारे व हातळण्यास सुलभ आहे.- चंद्रकांत जानकर, तालुकाध्यक्ष, दिव्यांग कर्मचारी संघटना, येवला

टॅग्स :Nashikनाशिक