शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शिक्षक अडचणीत : सरकारविरोधात पुकारला एल्गार विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:19 IST

महाराष्ट्र शासनाने कायम विना अनुदानित धोरण स्वीकारले त्यास आता १७ वर्ष पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्देमाय-बाप सरकार सांगा आम्ही जगायचं कसं? किमान ५० टक्के अनुदान देण्याची इच्छामतलबी, खोटारडेपणा जग जाहीर झाला

येवला : महाराष्ट्र शासनाने कायम विना अनुदानित धोरण स्वीकारले त्यास आता १७ वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या १७ वर्षांपासून विना वेतन ज्ञानदानाचे काम करणाºया शिक्षकांचे घर-कुटुंब आर्थिक संकटात असून, महाराष्ट्र विधानसभा व लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण हक्क कायद्याचे पालन करण्याकरता राज्य व केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विना अनुदानित शाळा, तुकड्यांना सरसकट १०० टक्के अनुदानाची तरतूद करून सर्व कायम विना अनुदानित, विना अनुदानित शाळा, तुकड्यांना विना अट अनुदान द्यावे, या मागणी विनाअनुदानित शिक्षकांच्या पत्नींनी सरकारविरोधी एल्गार पुकारला आहे.माय-बाप सरकार सांगा आम्ही जगायचं कसं? असा सवाल त्यांनी थेट राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पत्राद्वारे केला आहे. अध्यापक भारतीच्या संघटनेने याबाबत पुढाकार घेतला आहे. शिक्षणासारख्या मूलभूत बाबीसाठी कायम विना अनुदानित धोरण स्वीकारु न गेल्या १७ वर्षात या शाळा व तुकड्या चालविन्यासाठी टप्प्या-टप्प्याने किमान ५० टक्के अनुदान देण्याची इच्छा, तयारी शासन करू शकले नाही. वेठ बिगारा प्रमाणे शिक्षक राबत असून त्याने त्याचा प्रपंच, संसार, कुटुंब चालवायचं कसं असा सवाल पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. सरकारच्या कायम विना अनुदानित धोरणामुळे शिक्षक कर्मचाºयांचे कुटुंब बेजार झाले आहे. राज्यकर्त्यांच्या इच्छा शक्ती व नकारात्मक धोरणाचे ते सर्वच बळी झाले आहे. मागसवर्गाचा ६८ वर्षात अनुशेष भरला नाही. आजही मागास वर्गाच्या जागांवर काम करणारे कर्मचारी, संस्थांवर कार्यवाही न करण्याचा शासन कर्त्यांच्या मतलबी, खोटारडेपणा जग जाहीर झाला आहे. सरकार व संस्था चालकांनी मागास वर्गातील जागेवर खुला प्रवर्ग कर्मचारी नियुक्त करून मागास वर्गाच्या पिढ्या उध्वस्त केल्या आहेत. असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. एका बाजूला केंद्र राज्य सरकार शिक्षण हाक्क कायदा करून वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील बालकाच्या शिक्षणाची कायदेशीर जबाबदारी घेते तर दुसºया बाजूला त्याच विद्यार्थाना अध्यापन करणाºया शिक्षकांना विना वेतन १७ वर्षांपासून फुकटात राबवते, वेठिबगार म्हणून वागणूक देते ? असंख्य कर्मचाºयांना तर शिक्षण विभागाची साधी मान्यताही नाही. २० टक्के अनुदानाची फसवी घोषणा आंदोलन फोडण्या करता केलेला डाव होता. हे वास्तव समोर आले आहे. सातव्या वेतन आयोगासाठी अब्जावधींची तरतूद होऊ शकते, मग १७ वर्षांहून अधिक काळ फुकट राबणाºया लाचार, गुलाम शिक्षकांवर अन्याय का, असा सवाल करीत आता केवळ निवेदन देऊन आम्ही विना अनुदानित शिक्षक कर्मचारी यांच्या पत्नी स्वस्त बसणार नसून तीव्र आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व कायम विना अनुदानित शिक्षक पत्नी व कुटुंबातील व्यक्तींसह अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ,महिला-पालक प्रतिनिधी विनता सरोदे अ‍ॅड अरु ण दोंदे यासाठी प्रयत्न करीत आहेत.