शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीला वकिलांचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:05 IST

नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीस नशिक वकील संघाने विरोध केला असून, या करवाढीविरोधात लढणाऱ्या नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीला पाठिंबा दिला आहे़ जिल्हा न्यायालयातील जुन्या लायब्ररी हॉलमध्ये झालेल्या वकील संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़

ठळक मुद्देअ‍ॅड़ नितीन ठाकरे यांनी करवाढीमुळे भविष्यात निर्माण होणाºया परिणामांची माहिती दिली़ कृती समितीस पाठिंबा दर्शवून प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल,

नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीस नशिक वकील संघाने विरोध केला असून, या करवाढीविरोधात लढणाऱ्या नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीला पाठिंबा दिला आहे़ जिल्हा न्यायालयातील जुन्या लायब्ररी हॉलमध्ये झालेल्या वकील संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़नाशिक बार असोसिएशचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे यांनी करवाढीमुळे भविष्यात निर्माण होणाºया परिणामांची माहिती दिली़ तसेच कृती समितीस पाठिंबा दर्शवून प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असे सांगितले़ कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी महालिकेच्या करवाढीच्या निर्णयावर टीका करून या आदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले़ शेतजमीन, बिनशेती क्षेत्र, रुग्णालये, हॉटेल्स, वसतिगृहे, शाळा, क्रीडांगणे यांनाही महापालिकेने करवाढ केली असून, या अन्यायाबाबत एकत्र येण्याचे आवाहन केले़महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़जयंत जायभावे यांनी या करवाढीचा कायदेशीर अभ्यास करण्यासाठी वकिलांची एक समिती तयार करून महापालिकेला कायदेशीर सल्ला देण्यात येणार असल्याचे सांगितले़ तसेच हा सल्ला महापालिकेने न मानल्यास वा दरवाढ नियमानुसार न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे सुतोवाच जायभावे यांनी केले़ कृतीसमितीचे सल्लागार उन्मेष गायधनी यांनी सांगितले, की महापालिकेची करवाढ ही चौरस फुटाला लागू केली असली तरी प्रत्यक्षात क्षेत्राचे मोजमाप हे चौरस मीटरने केले जाते आहे़ त्यामुळे महापालिका ही नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे गायधनी म्हणाले़महापालिकेच्या करवाढीमुळे सर्वसामान्य माणसास सर्वाधिक फटका बसणार असून, वकिलांनाही करवाढीचा मोठा फटका बसणार आहे़ यावेळी माजी उपमहापौर गुरमित बग्गा, त्र्यंबक गायकवाड, दत्ता गायकवाड, अ‍ॅड. मुकुंद आढाव, नाशिक संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आहुजा, सह सेक्रेटरी अ‍ॅड. श्यामला दीक्षित, सदस्य अ‍ॅड. हर्षल केंगे, अ‍ॅड. शरद मोगल, अ‍ॅड. महेश लोहिते, अ‍ॅड. सोनल कदम तसेच वकील उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन अ‍ॅड. शरद गायधनी यांनी, तर आभार अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी मानले.