शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गणपूर्तीअभावी नाशिक बाजार समितीची बैठक तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 19:32 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाचखोर सभापती चुंभळे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांना धोरणात्मक आणि आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये अन्यथा सचिव जबाबदार असतील, असे पत्र

ठळक मुद्देउपसभापतींसह संचालक गैरहजर : गुरुवारी पुन्हा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी लाच घेतल्याने सहकार खात्याने त्यांचे सह्यांचे अधिकार काढल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी उपनिबंधकांनी दिलेल्या पत्राच्या आधारे बाजार समिती संचालकांची सोमवारी बोलाविण्यात आलेल्या विशेष बैठकीकडे उपसभापती युवराज कोठुळे यांच्यासह काही संचालकांनी पाठ फिरविल्यामुळे गणपूर्तीअभावी बैठक तहकूब करावी लागली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाचखोर सभापती चुंभळे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांना धोरणात्मक आणि आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये अन्यथा सचिव जबाबदार असतील, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक कृषी बाजार समितीला दिले होते. या पत्रावर निर्णय घेण्यासाठी उपसभापती कोठुळे यांनी पत्र काढून सोमवारी तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीला शंकर धनवटे, दिलीप थेटे, विश्वास नागरे, संजय तुंगार, तुकाराम पेखळे, हेमंत खंदारे, हंसराज वडघुले, रवि भोये, सुनील खोडे हे सदस्य उपस्थित होते. त्यात काही शासन नियुक्त सदस्य असल्याने त्यांना चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार आहे, मात्र मतदानाचा अधिकार नाही असे कारण सचिव काळे यांनी दिले व गणपूर्तीअभावी सभा तहकूब केली जाईल, असे सांगताच अन्य संचालकांनी आक्षेप घेतला. सचिव काळे हे सभापती चुंभळे गटाचे असल्याने केवळ त्यांना वाचविण्यासाठी बैठक तहकूब करत असल्याचा आरोप केला. अखेर गणपूर्ती नसल्याने बैठक तहकूब करत येत्या गुरुवारी (दि.५) पुन्हा सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.सकाळी बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित संचालकांनी सचिव काळे यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर बैठक सुरू असताना एक-दोन वेळा बैठकीला दांडी मारणाऱ्या उपसभापती कोठुळे यांनी अन्य एका इसमाच्या मोबाइलवर संपर्क साधून सचिव काळे यांच्याशी बातचीत केल्याने तो चर्चेचा विषय ठरला. दरम्यान तातडीची बैठक बोलाविणा-या उपसभापती कोठुळे यांनी सदर सभा बेकायदेशीर असल्याने आणि कोरम पूर्ण नसल्याने बैठक होणार नसल्याचे बैठक सुरू होण्यापूर्वीच प्रसार माध्यमांना स्पष्ट केले. त्यामुळे बाजार समितीला सुट्टी असताना बैठक बोलाविली कशी असा सवाल उपस्थित संचलकांनी केला. तर सदर बैठक केवळ चुंभळे गटाला हादरा देण्यासाठी पिंगळे गटाच्या पुढाकाराने बोलाविली असल्याची चर्चा संचालकांत सुरू होती. तसेच चुंभळे यांच्या गैरहजेरीत सह्यांचे अधिकार अन्य संचालकांना मिळावे यासाठी बैठक बोलाविण्यात आल्याचे बोलले जात होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक