शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यातील ताराबाई कानडे यांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 18:54 IST

लासलगाव : येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महीलेचा स्वाईन फ्लुने बळी घेतला. या महीलेला ३ दिवस थंडीताप येत होता म्हणून पाटोदा येथे दवाखान्यात उपचारासाठी बरेच दिवस ठेवण्यात आले. परंतु योग्य निदान न झाल्याने लासलगाव येथील एका मोठ्या दवाखान्यात आणले. मात्र तेथून लासलगाव ग्रामीण रूग्णालय आणले तेथेही चिंताजनक प्रकृती लक्षात घेवून सदर महिलेस तातडीने नाशिकला हलविण्यात येत असताना आडगाव नाका गाठण्या आगोदरच या महिलेने शेवटचा श्वास घेतला.

ठळक मुद्दे लासलगाव येथे चांदवड, येवले व निफाड तालुक्यातील काही गावात हे रूग्ण वाढत आहेत

लासलगाव : येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महीलेचा स्वाईन फ्लुने बळी घेतला. या महीलेला ३ दिवस थंडीताप येत होता म्हणून पाटोदा येथे दवाखान्यात उपचारासाठी बरेच दिवस ठेवण्यात आले. परंतु योग्य निदान न झाल्याने लासलगाव येथील एका मोठ्या दवाखान्यात आणले. मात्र तेथून लासलगाव ग्रामीण रूग्णालय आणले तेथेही चिंताजनक प्रकृती लक्षात घेवून सदर महिलेस तातडीने नाशिकला हलविण्यात येत असताना आडगाव नाका गाठण्या आगोदरच या महिलेने शेवटचा श्वास घेतला.ही महिला अत्यंत गरीब असुन लासलगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी तसेच निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले व डॉ. एच. एल. गायकवाड यांच्यासह व कर्मचारी यांनी तातडीने विविध दवाखान्यात माहीती घेतली असता रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे असे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले. स्वाईन फ्लुचे स्थानिक रूग्ण नाहीत परंतु लासलगाव येथे चांदवड, येवले व निफाड तालुक्यातील काही गावात हे रूग्ण वाढत आहेत.लासलगाव परिसरातल्या रूग्णांनी किरकोळ आजार असला तरी तातडीने डॉक्टर्स यांच्या सल्ल्यानुसार त्वरीत उपचार घ्यावेत व आपल्या राहत्या घराचे आसपास पाणी साचून देवू नये तसेच सात दिवसाचे आत पाणी रिकामे करून ताजे पाणीस्वच्छ करून प्यावे असे आवाहन निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.लासलगाव परिसरातील विविध गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून सर्दी खोकला यासह आजारी होणाºया रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रूग्णांनी घरीच परस्पर औषधे घेवू नयेत, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.