शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तपोवनचा शाही मार्ग वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:07 IST

धोकादायक झालेला गोदावरी नदीवरील जुना कन्नमवार पूल तोडण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे गोदावरी ते तपोवनाला जोडणारा नवा शाही मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे; मात्र भाविक पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक अद्याप तपोवन किंवा गोदाकाठच्या दिशेने लावण्यात आला नसल्यामुळे गैरसोय होत आहे.

नाशिक : धोकादायक झालेला गोदावरी नदीवरील जुना कन्नमवार पूल तोडण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे गोदावरी ते तपोवनाला जोडणारा नवा शाही मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे; मात्र भाविक पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक अद्याप तपोवन किंवा गोदाकाठच्या दिशेने लावण्यात आला नसल्यामुळे गैरसोय होत आहे.  गोदाकाठ-पंचवटी ते तपोवनमध्ये ये-जा करण्यासाठी नवीन शाही मार्ग हा सोयीस्कर ठरतो. या मार्गावरून भाविक पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात मार्गस्थ होत होती. मात्र कन्नमवार पूल तोडण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे या पुलापासून पुढे शाही मार्ग ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामाच्या डेब्रीजचा ढिगारा पडला आहे. सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारे दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. तसेच गोदाकाठावरील गौरी पटांगण येथे शाही मार्गाच्या प्रारंभीदेखील पुढे तपोवनाच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, असा फलक लावला गेला नसल्यामुळे पर्यटकांची वाहने कन्नमवार पुलापर्यंत येऊन पुन्हा माघारी फिरत आहेत किंवा डाव्या बाजूला वळण घेऊन महामार्गाने पुढे तपोवनात चौफुलीवरून मार्गस्थ होत आहे; मात्र प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी फलक उभारण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. कारण बाहेरगावाहून येणाºया पर्यटकांची यामुळे दिशाभूल होत असून, पर्यायी मार्गासाठी शोधाशोध करावी लागत आहे.डावे वळण अरुंद : मोठ्या वाहनांना अडथळा गोदाकाठ-रामकुंडापासून आल्यानंतर तपोवनात जाण्यासाठी डावे वळण घेताना मोठ्या बसेसला अडथळा निर्माण होत आहे. कारण सदर वळण अरुंद असून माती, दगडांचा या वळणालगत ढीग पडलेला दिसतो. त्यामुळे वळण रुंद करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे तपोवनातून रामकुंड-पंचवटीकडे येतानादेखील नागरिकांची गैरसोय होत आहे. पर्यटक नेहमीप्रमाणे कन्नमवार पुलापर्यंत आल्यानंतर रस्ता बंद असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात येते. त्यामुळे तपोवनातदेखील शाही मार्गाच्या प्रारंभी रस्ता पुढे वाहतुकीसाठी बंद असल्याचा सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक