शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

सहा वाड्यांना टॅँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:42 IST

चांदवड : उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत तसतशी तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली असून, तालुक्यातील सहा वाड्यांमध्ये दररोज ०२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

चांदवड : उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत तसतशी तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली असून, तालुक्यातील सहा वाड्यांमध्ये दररोज ०२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा जलयुक्त शिवार योजनेची कामे व पाऊस बऱ्यापैकी झाल्याने फारशी पाणीटंचाई जाणवली नसली तरी मे महिन्याच्या शेवटी चांदवड तालुक्यातील बºयाच गावावर विहिरी, बोअरवेल, जलसाठे शेवटची घटका मोजत आहेत. पाणी कमी पडल्याने बºयाच भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढली. आता पाऊस कधी पडेल याकडे सर्वांक़्हे लक्ष लागले आहे.चांदवड तालुक्यातील सहा वाड्यांना दोन खाजगी टॅकरने पाणी पुरवठा महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या जलकुंभावरुन करीत असल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश पाटील व पाणीपुरवठा अधिकारी सी. जे. मोरे यांनी दिली.चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील वाघाडवस्ती (कोंबडवस्ती), दरेगाव येथील गिरणारे वाटेवरील देवरे वस्ती, वाद येथील हरपडे खताळवस्ती, कानडगाव येथील जगताप वस्ती व कानडगाव येथील पाणपोई वस्ती अशा सहा वाड्यांना दोन खासगी टॅकरने महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या मनमाड-लासलगाव रोडवरील जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो आता जून महिना लागला असून केव्हा पाऊस पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पाऊस सुरू होउउन जलसाठ्यांमध्ये वाढ होईपर्यंत टॅँकरचे प्रस्ताव वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, शेतकर्यांना खरीप हंगामाचे वेध लागले असून, हा हंगाम पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वीच शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून, पाण्याच्या नियोजनात अडकले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.-------------------------------यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी पाणीटंचाईकडे फारसे लक्ष दिले नाही. कारण सर्वत्र कोरोनाची भिती मनात असल्याने प्रत्येक जण घरात बसूनच आपला बचाव करतांना दिसत असल्याने यंदा पाणीटंचाईची आरडाओरड फारसी झाली नसल्याचे सध्यातरी चित्र चांदवड तालुक्यात दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक