नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्काराने उद्या (दि.२०) नागालॅँड येथील ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती तेमसुला आओ यांना सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरुण साधू यांच्या हस्ते तेमसुला आओ यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. तेमसुला यांचे इंग्रजी भाषेतील साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या व काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्याचे भाषांतर आसामी, बंगाली व हिंदी भाषेतही झाले असून, काही साहित्य जर्मन व फ्रेंच भाषेतही अनुवादित झाले आहे. सध्या त्या नागालॅँडमधील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत.
तेमसुला यांना आज कुसुमाग्रज पुरस्कार
By admin | Updated: March 20, 2015 00:06 IST