शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तळवाडे भामेर कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:19 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर ...

ठळक मुद्देअनर्थ टळला : पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम, प्रशासनाकडून उपाययोजना

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर वाहून जात असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ तूर्तास टळला असला तरी पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे.बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील ४५ दलघफू क्षमता असलेले धरण १९९४ नंतर पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरले. मात्र धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणात वाहू लागल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी हा धोका ओळखून आमदार दिलीप बोरसे यांना याबाबत माहिती दिली असता बोरसे यांनी प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे,जलसंपदा विभागाचे अभियंता अभिजित रौदळ,शाखा अभियंता वाय जी पगार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेत पॉकलँड मशीनव्दारे तातडीची उपाययोजना करत सांडवा मोठा केला.धरणातील पाणी कमी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून धरण फुटल्याची शोशल मिडियावर अफवा पसरल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तळवाडे धरण फुटण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचा फोन आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ प्रशासनाच्या अधिका?्यांशी संपर्क साधून घटनास्थळी गेलो. पोकलँड मशीन उपलब्ध करून सांडव्यातून वाढीव पाणी काढून धरण फुटण्याचा धोका कमी झाला असून पुढील काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.- दिलीप बोरसे, आमदारतळवाडे धरण १९९४ नंतर प्रथमच पूर्णक्षमतेने भरले आहे.वेळोवेळी पाणी लिकेज होऊ नये म्हणून त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु या धरणाच्या क्षेत्रात पाऊस कमी असल्याने त्याच्याकडे जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष झालेले होते. धरणाला धोका निर्माण होऊन काही कमी-जास्त घडले तर याची जबाबदारी कोणाची?-अभिमन पगार, सामाजिक कार्यकर्ते, उत्राने.  

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRainपाऊस