शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च कळसुबाई शिखरावर युवकांनी उभारली उंच गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:50 IST

घोटी : राज्यातील सर्वोच्च असणाऱ्या कळसूबाई शिखरावर शनिवारी सकाळी घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाने नव्या वर्षाची गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले. अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या गिर्यारोहक युवकांनी यावेळी मतदान जनजागृती करण्याचा संकल्प केला.

ठळक मुद्देघोटी : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी केला जनजागृतीचा संकल्प

घोटी : राज्यातील सर्वोच्च असणाऱ्या कळसूबाई शिखरावर शनिवारी सकाळी घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाने नव्या वर्षाची गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले. अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या गिर्यारोहक युवकांनी यावेळी मतदान जनजागृती करण्याचा संकल्प केला. लोकशाही व्यवस्था बळकट होण्यासाठी जास्तीतजास्त मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार वापरण्याचा संकल्प नागरिकांकडून करून घेण्यात आला. नववर्षाच्या प्रारंभी पहाटेच शिखरावर जावून गुढी उभारल्यानंतर तरु णांनी मतदान जनजागृतीचा संकल्प केला. यावेळी उगवत्या सूर्याचे शिखरावरच दर्शन घेऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.घोटी येथील युवक नवरात्रीत तर दररोज उपाशीपोटी कळसुबाईच्या शिखरावर जातात. वर्षभरात अनेक उपक्र मांच्या माध्यमातून हे युवक नेहमीच शिखरावर जाऊन खऱ्या निसर्गाचा आनंद घेतात. सद्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला अनमोल असणारा मतदानाचा अधिकार वापरून लोकशाही व्यवस्था सक्षम करावी यासाठी उपक्र म राबवण्यात आला.कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गिर्यारोहक भगीरथ मराडे, काळू भोर, पंढरीनाथ दुर्गुडे, अशोक हेमके, प्रविण भटाटे, निलेश पवार, बाळू आरोटे, प्रशांत जाधव, उमेश दिवाकर, निलेश आंबेकर, ज्ञानेश्वर मांडे, संदीप परदेशी, सोमनाथ भगत, किसन दराणे, गोरख डगळे, कैलास धिंदळे, बाळू मधे, जालिंदर घाणे, पारधी सर, पांडुरंग तातळे आदी यामध्ये सहभागी झाले होते.देवी दर्शनाची अन नववर्षाच्या सूर्यदर्शनाची ओढनववर्षाचे स्वागत कळसूबाईच्या शिखरावर जावून गुढी उभारु न करण्यासह जागरूक नागरिक ह्या नात्याने मतदानाचा टक्का वाढावा असा संकल्प या दुर्गप्रेमी युवकांनी केला. गिर्यारोहक पहाटे घोटीतून निघत बारी येथून दीड तासात कळसूबाईच्या शिखरावर गेले. तेथे देवीचे विधीवत पूजन करु न नववर्षाचा संकल्प आणि मतदान जनजागृतीचा संकल्प केला.कळसुबाईच्या सर्वोच्च शिखरावर जावून नव्या वर्षाच्या स्वागताची गुढी उभारण्याची संधी मिळाली. मतदानाच्या प्रक्रि येत मतदारांची उदासीनता वाढत असल्याने सर्वांनी आपला अधिकार वापरावा म्हणून जनजागृती करण्याचा आम्ही संकल्प यावेळी केला. यासह कळसुबाई शिखरावर निसर्गाच्या सान्निध्यात सर्वोच्च गुढी उभारण्याचे भाग्य लाभले.- भगीरथ मराडे, अध्यक्ष, कळसुबाई मित्रमंडळ.