शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप

By admin | Updated: September 10, 2014 01:19 IST

वरुणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप

 

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, सोबत आकाशातून बरसणाऱ्या जलधारांनी द्विगुणित केलेला गणेशभक्तांचा उत्साह अन् ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत हजारो गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान, शहरातून काढण्यात आलेल्या सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत सुमारे एकोणीस लहान-मोठ्या गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.जुन्या नाशकातील वाकडी बारव कारंजापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. शहीद अब्दुल हमीद चौकामध्ये महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, उपमहापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांच्या हस्ते मनपा कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची आरती करण्यात आली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाघ यांनी श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ केला. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक विनायक पांडे, प्रा़ कुणाल वाघ, सुजाता करजगीकर, रामसिंग बावरी, शहर अभियंता सुनील खुने आदिंसह महापालिकेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. वाकडी बारवपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक दूधबाजार, शहीद अब्दुल हमीद चौकातून मार्गस्थ झाली.