शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

स्त्री रुग्णालयाबाबत मंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:18 IST

भाभानगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहालगत स्त्री रुग्णालयास जागा देण्यास स्थानिक नगरसेवकासह नागरिकांनी विरोध तीव्र करत सोमवारी (दि.३०) पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी, पालकमंत्र्यांनी सदर रुग्णालयाच्या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

नाशिक : भाभानगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहालगत स्त्री रुग्णालयास जागा देण्यास स्थानिक नगरसेवकासह नागरिकांनी विरोध तीव्र करत सोमवारी (दि.३०) पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी, पालकमंत्र्यांनी सदर रुग्णालयाच्या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. भाभानगर येथील स्त्री रुग्णालयाला जागा देण्यावरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातील वाद पेटला आहे. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौरांना तातडीने भाभानगरच्या जागेचा ठराव करून देण्याचे आदेशित केले होते. त्यामुळे भाभानगरच्या नागरिकांसह स्थानिक नगरसेवक व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती कथन केली. भाभानगर येथे स्त्री रुग्णालयाला जागा दिल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्थेसह नागरिकांना येणाºया अडचणींचा पाढा यावेळी पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला. सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत रुग्णालयाच्या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाभानगर ज्येष्ठ नागरिक बहुउद्दिष्ट सेवा समितीचे अध्यक्ष पी. व्ही. क्षीरसागर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, श्रीमती पटेल, चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.