शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तलहा परतला; मात्र कोरोना दहशतीने एकांतातच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:25 IST

सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूची दहशत असून, चीनच्या वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला येथील तलहा खलील अहमद शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तलहाच्या कुटुंबीयांना त्याच्याशी कोणताही संपर्क न ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्याने तलहा सध्यातरी एकांतातच आहे.

ठळक मुद्देमालेगावचा तरुण : वैद्यकीय पथकाची कुटुंबीयांशी भेट; आवश्यक सूचनाही दिल्या

शफीक शेखमालेगाव : सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूची दहशत असून, चीनच्या वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला येथील तलहा खलील अहमद शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तलहाच्या कुटुंबीयांना त्याच्याशी कोणताही संपर्क न ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्याने तलहा सध्यातरी एकांतातच आहे. दरम्यान रात्री शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याच्या घरी जाऊन त्याच्यासह कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करून काही सूचना केल्या. शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन तलहाच्या प्रकृती आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी वैद्यकीय अधिकारी माहिती देणार आहेत.सर्व जग कोरोना विषाणूच्या भीतीने ग्रासलेले असताना चीनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेला तलहा अहमद मालेगावी परतत असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने शहरातही कुतुहल आणि भीतीचे वातावरण होते. डॉक्टरांनीही तलहाच्या वडिलांना सक्त सूचना दिल्याने शुक्रवारी तलहाला कुणालाही भेटू दिले नाही. पत्रकारांकडून वारंवार संपर्क साधला जात असताना त्याचे कुटुंबीय मात्र काहीही बोलत नव्हते. वैद्यकीय अधिकारीदेखील काही बोलत नव्हते.दरम्यान, तलहा अहमदशी त्याचे वडील खलील अहमद यांनी मोबाइलवरून संपर्क साधून दिला. तलहा म्हणाला, मी चीनमध्ये होतो तेव्हाही वडील आणि कुटुंबीयांच्या संपर्कात होतो. आम्हाला विद्यापीठात बंद करून टाकण्यात आले होते. सर्व व्यवहार बंद झाले होते. विद्यापीठात आम्हाला मास्क पुरविण्यात येत होते. बाहेर कुणाशी संपर्क साधू दिला जात नव्हता. विद्यापीठाबाहेरून कुणीही मदत करीत नव्हता. केवळ विद्यापीठाकडूनच आम्हाला मदत मिळत होती. आम्हाला दैनंदिन लागणारे साहित्य विद्यापीठ बाहेरून पुरवित होते, मात्र घरी प्रचंड दहशत होती. आम्ही सुरक्षित आणि सुखरूप असल्याचे आम्ही रोज पालकांना सांगत होतो. भारतीय दुतावासाने आम्हा विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे सातशे विद्यार्थ्यांना दिल्लीत आणले गेले. तेथे रक्ताचे नमुने घेतले गेले, त्यानंतर हरियानाच्या मणिसार मिलिटरी ट्रेनिंग कॅम्पमध्ये हलविण्यात आले. तेथे डॉक्टर्स रोज येऊन चेकअप करीत. रोज नियमित जेवण नेहमीप्रमाणे असे. कोणतेही बंधन नव्हते. सर्वांना वेगेवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले होते; तर मुलींना मात्र दिल्लीतच वेगवेगळे ठेवण्यात आले होते. आम्हाला वारंवार फोनवरून सूचना दिल्या जायच्या, मात्र आता पुढे काय होईल, कुठे पाठविले जाईल, याबाबत काही सांगितले जायचे नाही. महाराष्ट्रातील माझ्या परिचयाचे चार जण होते. त्यात एक जण नाशिकचा, तर इतर मुंबई, ठाणे आणि कल्याणचे विद्यार्थी होते.अखेर कालपर्यंत हरियानात शासकीय वैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर आम्हाला कोणताही आजार नसल्याचे सर्टिफिकेट देऊन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आता तलहा जरी मालेगावात आला असला तरी त्याला पंधरा दिवस वैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली राहावे लागणार आहे. रोज शासकीय वैद्यकीय पथक त्याच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करणार आहे. त्याच्या कुुटुंबीयांचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, परिसरावर वैद्यकीय अधिकाºयांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.आम्ही सर्व कुटुंबीय दहशतीत आहोत. आपल्या मुलाला समाजाकडून काही त्रास होऊ नये म्हणून त्याचा फोटो देण्यास वा फोटो काढू देण्यास सक्त मनाई केली, मात्र तरी त्याचे नातेवाईक आणि मित्र परिवार फोनवर संपर्क साधून प्रकृतीची चौकशी करीत आहेत.- खलील अहमद, तलहाचे वडील

टॅग्स :corona virusकोरोनाHealth Tipsहेल्थ टिप्स