शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सवंदगाव शिवारातील घटनेनंतर तलाठी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:04 IST

मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणानदी पात्रालगत वाळु खाणीतुन अवैध वाळु उपसा करताना ढिगारा कोसळून भावडू रामचंद्र वाघ या मजुराचा मृत्यु झाला होता तर दोन मजुर गंभीर जखमी झाले होते. या प्रकारानंतर येथील महसुल विभाग खडबडून जागा झाला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकबाबत निष्काळीपणा, हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सवंदगाव येथील तलाठी एन.एस. पवार यांना प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निलंबीत केले आहे.

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गिरणा नदी पात्रालगत तंबु ठोकून गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ५ ते १५ सप्टेंबर पर्यंतच्या गस्तीचे नियोजन करुन २१ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता केवळ तलाठ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाळु माफियांशी हितसंबंध असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांना महसूलच्याच अधिकाºयांनी मोकळीक दिली आहे. वराती मागुन घोडे नाचविण्याचा महसुलचा प्रकार दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सवंदगाव शिवारातील गिरणानदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा केला जातो. सध्या गिरणा नदीला पाणी असल्याने नदी पात्रालगतच्या खाणीतून वाळू उपसा सुरू होता. सोमवारी अवैधरित्या वाळु उपसा करीत असताना ढिगारा कोसळुन मजुराचा मृत्यु झाला. ग्रामस्थांनी महसुल अधिकाºयांना जबाबदार धरले होते. तर महसुल विभागाने यापूर्वी १९ जणांवर गुन्हे दाखल केल्याचे सांगून सरवासारव केली होती. वाळुमाफियांकडून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी २४ तासांसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या भागात महसुलचे कर्मचारी दिवस-रात्र गस्त घालणार आहेत. तसेच तंबु ठोकून लक्ष देणार आहे. या कामात हलगर्जी करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. एका पथकात मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल व एक पोलीस असे चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे २१ पथकांची निर्मिती करण्यात आली असून एक पथक १२ तास गस्त घालणार आहे. पथकांना थांबण्यासाठी एक तंबु ठोकण्यात आला आहे. सध्या दहा दिवस गस्तीचे नियोजन करण्यात आले आहे.गस्तीवर असणाºया अधिकाºयांची रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाणार आहे. या दरम्यानची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील नियोजन केले जाणार आहे. वाळु चोरट्यांवरील सातत्य ठेवणार असल्याची माहिती महसुलच्या अधिकाºयांनी दिली. तसेच गिरणा व मोसम नदी पात्रातुन अवैध वाळु उपशा करणाºयांवरही धडक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMalegaonमालेगांव