शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
5
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
6
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
7
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
8
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
9
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
11
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
12
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
13
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
14
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
15
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
16
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
18
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
19
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल

 कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या 'त्या' चारही फ्लॅटचा ताबा घ्या..! नाशिक न्यायालयाचा दणका 

By अझहर शेख | Updated: February 20, 2025 21:35 IST

न्यायालयाने कोकाटे बंधूना दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५०हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे...

नाशिक : कृषीमंत्री आरोपी माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत फसवणूक व बनावटीकरण करून मिळविलेल्या चारही फ्लॅटचा ताबा शासनाच्या राज्य गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) तसेच उपजिल्हाधिकारी (युएलसी) घ्यावा, असेही नाशिक येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती आर.सी.नरवाडीया यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने कोकाटे बंधूना दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५०हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून कोकाटे बंधूंनी कॅनडा कॉर्नर येवलेकर मळा परिसरातील निर्माण व्ह्यू नावाच्या अपार्टमेंटमध्ये  कागदपत्रांचे बनावटीकरण करत चार फ्लॅट घेतले होते. कोकाटे बंधूंनी त्यांच्या नावावर दोन तर अन्य दोघांच्या नावावर दोन फ्लॅट दाखविले होते; मात्र प्रत्यक्षात हे चारही फ्लॅट कोकाटे हे स्वत:च वापरत होते. तेथे त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम केले, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीप्रसंगी माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी धरण्यात आले आहे. या चारही फ्लॅटचे वाटप रद्द करण्यात यावे आणि ताबा परत मिळविण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करण्याचे निर्देशदेखील न्यायालयाने म्हाडा व युएलसी उपजिल्हाधिकारी यांना दिले आहेत. यासाठी न्यायालयाने अपील कालावधी संपण्यापर्यंतची मुदत प्रशासनाला दिली आहे.

 ...असे आहे शिक्षेचे स्वरूप आरोपी क्र. १ माणिकराव कोकाटे व आरोपी क्र.२ विजय कोकाटे यांना न्यायालयाने भादंवि कलम-४२०अंतर्गत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजारांचा दंड. तसेच दोन्ही आरोपींना भादंवि कलम-४६५ अंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यासाठी कलम२४८(२)अंतर्गत दोषी धरण्यात आले. त्यासाठी दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली. एकुण प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे १ लाख रूपयांचा दंड न्यायालयात कोकाटे यांनी भरला.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेCourtन्यायालय