शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमात उद्योजकांच्या यशकथा घ्याव्यात : भोगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:37 IST

आज पदवी, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमात परदेशांमधील उद्योजकांच्या कथा, त्यांची कार्यपद्धती शिकविली जाते. पण तेथील वातावरण, कायदे, स्थिती आपल्या देशात लागू होत नाही.

नाशिक : आज पदवी, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमात परदेशांमधील उद्योजकांच्या कथा, त्यांची कार्यपद्धती शिकविली जाते. पण तेथील वातावरण, कायदे, स्थिती आपल्या देशात लागू होत नाही. त्यामुळे आपल्या देशातील यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा आपल्या अभ्यासक्रमात असल्या पाहिजेत. त्यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक रामचंद्र भोगले यांनी केले. चोपडा लॉन्स येथे शनिवारी (दि.२५) पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. दत्ता जोशी लिखित ‘पोलादी माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. ते पुढे म्हणाले, गुन्हेगारांची यादी सर्व पोलीस ठाण्यांना पटकन उपलब्ध होते; पण समाजाच्या चांगल्या लोकांची यादी सहसा कोणाकडे नसते. हे काम या पुस्तकातून सहजतेने झाले आहे.सुनील गोयल यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना समाजसेवेचे हे व्रत आम्ही हाती घेतले असून, ते प्रामाणिकपणे चालू ठेवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक दत्ता जोशी यांनी या पुस्तकनिर्मितीसाठी केलेला प्रवास, आलेले अनुभव नमूद केले. याप्रसंगी एम. के. बिरमानी, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, नरेंद्र गोलिया, एम. जे. नंदेशीय, सुनील बनारसीदास, विवेक कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, सी. एल. कुलकर्णी आदी उपस्थित होते.प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वसमाजातील आदर्श शोधून या पुस्तकातून सादर केले आहेत. हे अत्यंत अवघड काम जोशी यांनी केले असून, ही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त मार्गदर्शक ठरू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिक