शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडी जॉगिंग ट्रॅकचा भटक्या श्वानांकडून ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:16 IST

स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल लगत मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जॉगर्सने केली आहे.

ठळक मुद्देफिरणे मुश्किल : अंगावर धावून जाण्याचे प्रकार

पंचवटी : स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल लगत मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जॉगर्सने केली आहे.हिरावाडीत पाण्याच्या पाटाला लागून महापालिकेने तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या सुमारास युवक, नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. याच ट्रॅकवर पंधरा ते वीस मोकाट श्वान बसलेले असतात. सकाळी नागरिक ट्रॅकवर येत असले तरी या ठिकाणी विद्युत व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागते. ट्रॅकवर बसलेले श्वान फिरणाºया नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने या श्वानांची नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिवसभर ट्रॅकचा ताबा घेतलेले हे मोकाट श्वान ट्रॅकची माती उखडून खड्डे करत असल्याने या खड्ड्यात तोल जाऊन नागरिकांच्या पायाला दुखापत होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मोकाट श्वानांमुळे नागरिकांना सकाळी स्वसंरक्षणार्थ फिरताना हातात दगड किंवा काठ्या घेऊन ये-जा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते. लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या अद्ययावत ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांनी ताबा घेतल्याने महापालिका प्रशासनातर्फे वेळीच श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ट्रॅकवर फिरण्यासाठी येणाºया नागरिकांनी केली आहे.पाळीव श्वानांचाही त्रासनागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या सुमाराला काही महिला, नागरिक पाळीव श्वान फिरवण्यासाठी घेऊन येतात. हे पाळीव श्वान ट्रॅकवर लघुशंका तसेच प्रातर्विधी करत असल्याने जॉगिंग ट्रॅक नागरिकांना फिरण्यासाठी की पाळीव श्वानांसाठी, असा सवाल नागरिक करीत आहे. जॉगिंग ट्रॅकवर पाळीव श्वान घेऊन फिरणाºया नागरिकांवर मनपाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdogकुत्रा