शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत कॉँग्रेस घेईना, राज पत्ते खोलेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:45 IST

सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात तब्बल २ लाखांहून अधिक मते घेत राष्टÑवादी कॉँग्रेससमोर तगडे आव्हान उभे केलेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला २०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नाशिक : सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात तब्बल २ लाखांहून अधिक मते घेत राष्टÑवादी कॉँग्रेससमोर तगडे आव्हान उभे केलेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला २०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता १७ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली असताना मनसेच्या गोटात मात्र स्मशान शांतता आहे. एकीकडे मनसेला महाआघाडीत घेण्यास कॉँग्रेसने आपली विरोधाची भूमिका कायम ठेवलेली असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मात्र, अद्याप त्यांच्या मनातील डावपेचाचे पत्ते खोलले जात नसल्याने कार्यकर्ते संभ्रमित आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार असेल की नसेल, या विषयी उत्सुकता वाढलेली आहे.सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातून मनसेचे तीन आमदार निवडून गेले होते. याशिवाय नाशिक महापालिकेत तब्बल ४० जागा जिंकून मनसेने इतरांच्या मदतीने सत्ता हस्तगत केली होती. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात मनसेचे हेमंत गोडसे यांनी २ लाख १६ हजार मते घेऊन राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना कडवी लढत दिली होती.मात्र, अवघ्या २२ हजार मतांनी गोडसे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, पुलाखालून बरेच पाणी वाहून जात सन २०१४ च्या निवडणुकीत गोडसे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेत राष्टÑवादीचे मातब्बर उमेदवार छगन भुजबळ यांना पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी, मनसेने राज यांचे निकटचे स्नेही डॉ. प्रदीप पवार यांना निवडणुकीत उतरवले होते. परंतु, मोदी लाटेत मनसेचाही पुरता धुव्वा उडाला होता. पवार यांना ६३ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. मनसे त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता मोदी यांना विरोधासाठी राज्यात कॉँग्रेस-राष्टÑवादीसह महाआघाडी उभी राहत असताना महाआघाडीत मनसेला घेण्यास राष्टÑवादी कॉँग्रेस उत्सुक असून कॉँग्रेसने मात्र जोरदार विरोध दर्शविलेला आहे. एकीकडे मनसे लोकसभेची एकही जागा लढणार नसल्याचे राष्टÑवादीचे नेते जाहीरपणे सांगत असताना मनसेकडून मात्र त्याबाबत स्पष्टता केली जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसे असणार की नाही, याबाबत काहीही निर्णय होत नसल्याने मनसेकडून कुणा इच्छुकांच्याही नावाची चर्चा होताना दिसून येत नाही. गेल्या दोन वेळच्या निवडणुकीत राष्टÑवादीवर सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडून यंदा राष्टÑवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार काय, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.वर्धापनदिनीही वेट अ‍ॅण्ड वॉचच!मनसेचा वर्धापनदिन गेल्या ९ मार्चला मुंबईत पार पडला. त्यावेळी, राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी आपण लोकसभा निवडणुकीबाबत आता काहीही बोलणार नसल्याचे सांगत भूमिकेबाबत संदिग्धता कायम ठेवली. आपण यापुढे खूप काही सांगणार असल्याचे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रतीक्षा कायम ठेवली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMNSमनसे