शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उष्णतेने आरोग्याची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:18 IST

सध्या नाशिक शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाड्यामुळे आबालवृद्धांना मोठा त्रास होत आहे. विशेषत: गर्भवती महिलांना कडकाच्या उन्हामुळे घरातदेखील अस्वस्थ वाटते. त्यामुळ सर्वांनीच उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याची गरज आहे.

एक्सपर्ट व्ह्यूसध्या नाशिक शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाड्यामुळे आबालवृद्धांना मोठा त्रास होत आहे. विशेषत: गर्भवती महिलांना कडकाच्या उन्हामुळे घरातदेखील अस्वस्थ वाटते. त्यामुळ सर्वांनीच उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याची गरज आहे.वाढत्या तापमानामुळे अतिसार, उलटी, डोकेदुखी, अचानक घाम येणे, तोंडाला कोरड पडणे, चक्कर येणे असे प्रकार घडू शकतात. तसेच उष्माघातामुळे मनुष्याच्या जिवालादेखील धोका पोहचू शकतो. यासाठी तीव्र उन्हात शक्यतो बाहेर पडू नये. सकाळच्या वेळी ९ वाजेच्या आत घराबाहेरील कामे पूर्ण करावी किंवा सायंकाळच्या वेळी बाहेर पडावे.तसेच कामानिमित्त दुपारी बाहेर पडावे लागले तर पूर्णपणे अंगावर कपडे घालावे, डोके पूर्ण झाकून घ्यावे, डोक्याला रुमाल बांधावा. शक्यतो सैलदार व पांढरे कपडे घालावेत. डोळ्यावर गॉगल लावावा. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.दिवसातून साधारणत: ४ ते ५ लिटर पाणी प्यावे, त्याचप्रमाणे ताक प्यावे, कैरी आणि चिंचाचे पन्हे यांचे सेवन करावे. टरबूज, खरबूज आणि काकडी खावी, हलका आहार घ्यावा. उन्हाळ्यात जेवण फारसे जात नाही, परंतु शरीराला पचेल असे हलके अन्न घ्यावे. प्रत्येकाने उन्हाळ्यात कडक उन्हापासून आपल्या शरीराची व आरोग्याची काळजी घेतल्यास फारसा त्रास जाणवणार नाही. उष्माघाताची लक्षणे दिसताच त्यावर प्राथमिक उपचार केल्यास दाहकता कमी होते़   (लेखक : स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत)थंड पाणी प्यावेलहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांनी उन्हात घराबाहेर पडू नये. उन्हात शरीराला घाम खूप येतो त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करावी. चेहरा व हातपाय थंड पाण्याने धुवावे. थंड पाणी प्यावे. चक्कर येत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तत्काळ डॉक्टराकडे जावे. घरात खेळती हवा राहू द्यावी, असे अनेक उपाय सांगता येतीलरुग्णांना त्रासरुग्णाला कडाक्याच्या उन्हापासून दूर ठेवावे, रुग्णाच्या अंगावरील कपडे सैल करून त्याच्या अंगावर पाणी शिंपडावे, रुग्णाला मोकळ्या हवेत बसवून उन्हाच्या झळा बसणार नाहीत याची काळजी घ्यावी़

टॅग्स :TemperatureतापमानHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल