शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

पैसे मागणाºयांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:18 IST

भूमिअभिलेख खात्यातील मोजणी कामासाठी खासगी व्यक्ती अनधिकृतपणे पैसे मागतात अशा व्यक्तीवर भूमिअभिलेख अधिकाºयांनी त्वरीत गुन्हा दाखल करावा, जलयुक्तच्या कामात हयगय करू नये असा इशारा देत , आमसभा ही जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी असते. यात जर अधिकारी कसूर करीत असतील तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयांनी त्यांची गय करू नये अशा सूचना चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी चांदवड पंचायत समितीच्या आमसभेत बोलताना व्यक्त केले.

चांदवड : भूमिअभिलेख खात्यातील मोजणी कामासाठी खासगी व्यक्ती अनधिकृतपणे पैसे मागतात अशा व्यक्तीवर भूमिअभिलेख अधिकाºयांनी त्वरीत गुन्हा दाखल करावा, जलयुक्तच्या कामात हयगय करू नये असा इशारा देत , आमसभा ही जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी असते. यात जर अधिकारी कसूर करीत असतील तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयांनी त्यांची गय करू नये अशा सूचना चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी चांदवड पंचायत समितीच्या आमसभेत बोलताना व्यक्त केले.  चांदवड पंचायत समितीच्या आमसभेत विविध विकासकामांवर चर्चा झाली. आमसभेस अनुपस्थित अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस द्या, ही आमसभा चांदवड येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार डॉ. अहेर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, सभापती डॉ. नितीन गांगुर्डेे, उपसभापती अमोल भालेराव, जिल्हा परिषद सदस्य कविता धाकराव, सदस्य नितीन अहेर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  आमदार डॉ. अहेर यांनी बोलताना सांगितले की, चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर या आमसभेस नाहीत, त्यांचे बरेच प्रश्न असून, त्यासाठी स्वतंत्र बैठक पुढील महिन्यात घेऊ तर या आमसभेत ज्या प्रश्नांवर चर्चा झाली त्यांची सोडवणूक येत्या तीन आठवड्यात व्हावी, तसा अहवाल त्वरित पाठवावा अशा सूचना अधिकाºयांना बैठकीत देण्यात आल्या. चांदवड तालुका सातत्याने दुष्काळी तालुका असून पुणेगाव, ओझरखेड, राहुड -ऊसवाड पाटचारी, वडबारे पाटचारी, जांबुटके धरणाची उंची वाढविणे, मांजरपाडा आदी प्रश्नांसाठी शासनाने दखल घेऊन लवकरच या प्रश्नासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हे प्रश्न सुटतील त्या कामाची माहिती आमदारांनी दिली. येणाºया पावसाळ्यात राहुड उसवाड पाटचारीला पाणी आल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.उपस्थित पदाधिकाºयांनी आपापल्या भागातील वीज, पाणी, रस्ते, भूमिअभिलेख, तहसील कार्यालय, मोजणी आदी समस्या मांडल्या. प्रास्ताविक गटविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी केले, तर सूत्रसंचालन जर्नादन देवरे, सुनील सोनवणे यांनी केले.  यावेळी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता नीलेश नागरे, एस. टी. महामंडळाचे दत्तप्रसाद बागुल, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, विजय पवार, भूमिअभिलेखचे राजेंद्र कपोते आदी उपस्थित होते.  या सभेत चांदवड शहराची पाणी योजना, चांदवड मनमाड रस्ता, तालुक्यातील प्रलंबित रस्ते, चांदवडचा बसस्थानकाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, शाळांच्या वीजबिलाच्या प्रश्नावर आमदारांनी माहिती सभेत दिली. तर यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नार-पारचा पाणी प्रश्न व चांदवड तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.

टॅग्स :MLAआमदार