शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

तलाठ्यांच्या मेहनतान्यावर तहसीलदारांनीच डल्ला

By admin | Updated: November 23, 2014 00:41 IST

तलाठ्यांच्या मेहनतान्यावर तहसीलदारांनीच डल्ला

नाशिक : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहोचविण्याची महत्त्वाची कामगिरी बजावताना तलाठ्यांना आलेल्या खर्चाची तजवीज शासनाने करून त्यासाठी कोट्यवधींचा निधीही पाठविलेला असला तरी, गेल्या दोन वर्षांपासून ही रक्कमच गायब झाली आहे. जिल्हा प्रशासनाने ही सारी जबाबदारी तहसीलदारांवर ढकलल्यामुळे तलाठ्यांच्या मेहनतान्यावर तहसीलदारांनीच डल्ला मारल्याची भावना व्यक्त केली जात असून, त्यामुळे यापुढे अशा स्वरूपाचे काम न करण्याचा इशाराच तलाठी संघटनेने दिला आहे. तलाठ्यांना सर्वच प्रकारची शासकीय कामे करावी लागत असल्याचे पाहून शासनाने दोन वर्षांपूर्वी राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करणाऱ्या व त्यानंतर शेतकऱ्यांना मदत वाटणाऱ्या तलाठ्यांना झालेल्या खर्चापोटी रक्कम देण्याचे निश्चित केले होते. सन २०११-१२ व २०१२-१३ या दोन वर्षात राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हजार रुपये अनुदान वाटप करण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले होते. त्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे, त्याचे संगणकीकरण करणे, सी. डी. तयार करणे, झेरॉक्स काढणे, शेतकऱ्यांचे बॅँक खाते जमा करणे अशा विविध प्रकारचे कामे पदरमोड करून करावे लागले. प्रत्येक तलाठ्याला त्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च आल्याने शासनस्तरावरून त्याची पूर्तता व्हावी, अशी मागणी तलाठ्यांनी केल्यावर ज्या प्रमाणात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल व शासनाने मदतीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले असेल त्याच्या ०.५ टक्के रक्कम तलाठ्यांना मेहनताना देण्याचे ठरविण्यात आले व तशी तरतूदही करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यासाठी जवळपास दोन कोटी रुपये तलाठ्यांना देण्यासाठी स्वतंत्र देण्यात आले, त्याच बरोबर त्या त्या तालुक्याची शेतकऱ्यांचे नुकसानीचे शासकीय अनुदान व तलाठ्यांना देण्यात येणारा मेहनताना याचा निधीही जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयात वर्ग करण्यात आला होता. परंतु तहसीलदारांनी या रकमेचे वाटप केलेले नाही. विशेष म्हणजे, राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठ्यांच्या झालेल्या खर्चाची तजवीज प्रशासनाकडून करण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यातच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आलेला निधी गेला कुठे, असा सवाल केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने सदरची बाब तहसीलदारांच्या अखत्यारितील असल्याने आपले हात वर केले असल्याने दोन कोटी रुपयांचे गूढ वाढून तहसीलदारांभोवती संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. सर्वच तहसीलदारांनी एकत्र येऊन ही रक्कम हडप केल्याचा संशयही घेतला जात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पुन्हा एकवार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचा प्रश्न निर्माण झाल्यास तलाठ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)