शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

ताहाराबाद रस्ता धोकेदायक

By admin | Updated: June 12, 2016 23:30 IST

नामपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नाराजी

 द्याने : नामपूर-ताहाराबाद रस्ता हा अत्यंत रहदारीचा असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूचा सापळा बनला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक दुचाकीस्वारांना अपंगत्व आले आहे. रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रेंगाळत पडला असून द्याने गावाजवळील अपघाती वळणावर दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होत असतात. द्याने ते ब्राह्मणपाडे गावापर्यंत साइड पट्ट्या खोल गेल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेकदा हुज्जत घालून रस्ता द्यावा लागतो. अवैध वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व अ‍ॅपेरिक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असतात. पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने अनेकदा अपघात होत असतात. थातूरमातूर कारवाई करण्यात येते. परत ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात राज्यात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दिशादर्शक फलक चोरट्यांनी लंपास केल्याने बांधकाम विभागाचे कर्मचारी नवीन फलक लावण्याची तसदी घेत नाहीत. पावसाळ्यात रस्त्यावरील साइडपट्ट्यांमुळे अनेक वाहने घसरतात. रस्ता रुंदीकरण कामाचे घोडं अडलंय कुठे, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. अनेकदा निवेदने रास्ता रोको आंदोलन करूनही रस्ता रुंदीकरण कामास मुहूर्त मिळत नाही. ताहाराबादपासून ब्राह्मणपाडे गावापर्यंत रस्ता रु ंदीकरण झाले असून आसखेडा गावाजवळील जिल्हा परिषद शाळेजवळ साईडपट्ट्या खोदलेल्या असून पावसाळ्याअगोदर काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.रस्त्यावरील दुतर्फा असलेली बरीचशी झाडे वाळली असून रस्त्यालगत असलेली झाडे शेतकऱ्यांनी तोडून टाकली आहेत. मैलबिगारी पावसाळा सुरू होण्याअगोदर हजेरी लावतात. पावसाळा सुरू होण्याअगोदर कामे पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे. (वार्ताहर)