शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांकडून अधिकाºयांना तंबीकर्तव्याचे धडे : कामकाज सुधारण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:49 IST

नाशिक : महसूल खात्यातील प्रांत व तहसीलदारांकडून कर्तव्यात होत असलेली कुचराई, जनतेला केली जात असलेली दुरुत्तरे व अधिकाराचा दुरुपयोगाच्या विषयावरून गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागातील अधिकाºयांचा खºया अर्थाने ‘तास’ घेऊन त्यांना जाणीव करून दिली. यावेळी अधिकाºयांनी केलेल्या चुकांचा पाढाच वाचून अधिकाºयांना झणझणीत अंजन घालतानाच कामकाज सुधारा, अन्यथा कारवाईला ...

नाशिक : महसूल खात्यातील प्रांत व तहसीलदारांकडून कर्तव्यात होत असलेली कुचराई, जनतेला केली जात असलेली दुरुत्तरे व अधिकाराचा दुरुपयोगाच्या विषयावरून गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागातील अधिकाºयांचा खºया अर्थाने ‘तास’ घेऊन त्यांना जाणीव करून दिली. यावेळी अधिकाºयांनी केलेल्या चुकांचा पाढाच वाचून अधिकाºयांना झणझणीत अंजन घालतानाच कामकाज सुधारा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीही दिली.सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत एकट्या विभागीय आयुक्तांनी उपस्थिताना नुसते मार्गदर्शनच केले नाही तर शासकीय कामकाम करताना काही मार्गदर्शक तत्त्वेही घालून दिली. प्रामुख्याने शासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी अधिकाºयांनी स्वत:ला झोकून दिले पाहिजे मात्र, अद्यापही अधिकाºयांमध्ये पंधराव्या व सोळाव्या शतकानुसार कामकाज केले जात असल्याचे झगडे म्हणाले. अधिकाºयांची ही मानसिकता संवेदनशून्य असून, वरिष्ठ कार्यालयाला माहिती पाठविताना केले जाणारे दुर्लक्ष, चुकीची माहिती देणे, स्मरण पत्रे पाठवूनही प्रतिसाद न देणे या साºया बाबी कामचुकारपणाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांचा उपविभागीय अधिकाºयांवर, उपविभागीय अधिकाºयांचा तहसीलदारांवर व तहसीलदारांचा तलाठी, मंडळ अधिकाºयांवर कोणताही धाक व नियंत्रण नसल्याचे सांगून, झगडे यांनी गावपातळीवरील तक्रारींचे निराकरण तेथेच केले तर जनतेला तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी यावेच लागणार नाही, परंतु अधिकारी व कर्मचाºयांची मानसिकता जनतेचे काम सुकर करण्यासाठी नसून त्यांना त्रास देणारीच असल्याचे नमूद केले.आयुक्त झगडे यांनी यावेळी महसूल खात्यातील प्रत्येक शाखेचे कामकाज कशा पद्धतीने चुकीचे चालते याची काही कागदपत्रेच बैठकीत सादर केली. त्यात प्रामुख्याने महसूल शाखा, पुरवठा शाखा, पुनवर्सन शाखा, निवडणूक शाखा अशा सर्वच शाखांची उदाहरणे देऊन अधिकाºयांना झणझणीत अंजन घातले व दाखविलेल्या चुका या उदाहरणादाखल असून, त्यापेक्षाही भयंकर गंभीर चुकांचे पुरावे आपल्या ताब्यात आहेत, परंतु ते येथे सादरीकरण करणे योग्य ठरणार नाही असे सांगून, ज्याने त्याने ते समजून घ्यावे, असा गर्भित सल्लाही दिला. विभागातील जिल्हाधिकाºयांनाही त्यांनी सोडले नाही. खालचे अधिकारी काय अहवाल पाठवतात याची खातरजमा न करताच माहितीचे सादरीकरण करणे सोडा, प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामकाजाची पाहणी करा व आपल्या अधिकारात नसलेली कामे करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी झगडे यांनी उपस्थिताना मध्येच अधूनमधून प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाची परीक्षाही घेतली.