सिन्नर : शहराची चौफेर वाढ होत असून नवनवीन रहिवाशी वसाहती, उपनगरे वसत आहेत. या पार्श्वभूमीवर सिन्नर नगरपरिषदेने सर्वसामान्य नागरिकांना नवीन घर बांधकामासाठी परवानगी देणे, भोगवटा प्रमाणपत्र देणे या बाबींसाठी महा-वास्तू प्रणाली (बी.पी.एम.एस.) लागू केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडून बांधकाम परवानगी, पुर्णत्वाचा दाखला मिळविणे सहजसुलभ होणार आहे.शहरातील वास्तुविशारद, अभियंता यांची नोंदणी महावास्तु प्रणाली (बी.पी.एम.एस.) द्वारे करण्यात आली आहे. तथापि, या कामी उदभवणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्यावर पर्याय शोधण्यासाठी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील वास्तुविशारद, अभियंता यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस नगरपालिकेचे अभियंता सुरेश गवांदे, जनार्दन फुलारी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यशाळेत बी.पी.एम.एस. प्रणाली द्वारे कार्य करीत असतांना येणाºया अडचणी बाबत शहरातील वास्तुविशारद व अभियंता यांनी आपले मत मांडले. त्यावर मुख्याधिकारी दूर्वास व अभियंता यांनी त्यांना मार्गदर्शन केले.महावास्तू प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी व प्रकरणांचा लवकर निपटारा होण्यासाठी आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते सायं ६ यावेळेत शहरातील वास्तुविशारद, अभियंता यांनी नगरपरिषद कार्यालयात येवून प्रकरणाबाबत नगरपरिषदेच्या अभियंता यांच्याशी समन्वय साधुन प्रकरणांचा निपटारा करणेत यावा असे बैठकीत निश्चित करण्यात आले.बैठकीस नीलेश पवार, वैभव मुत्रक, समाधान गायकवाड, महेंद्र तारगे, निशांत माहेश्वरी, बाळासाहेब वाघ, जितेंद्र जगताप, गणेश हांडोरे, दत्ता बोराडे, रामनाथ सांगळे आदींसह शहरातील वास्तुविशारद, अभियंता यांनी चर्चेत भाग घेतला.आॅनलाईन बांधकाम परवानगी प्रमाणपत्रशहरातील बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र देणे ही कामे अर्जदार यांचा अर्ज नगरपरिषदेकडे दाखल करुन तांत्रिक छाननी केल्यानंतर परवानगी देणेबाबत कार्यवाही करण्यात येत होती. यात सुसूत्रता येण्यासाठी व नागरिकांना वेळेवर विनाविलंब बांधकाम परवानगी, मिळण्यासाठी १५ मे २०१८ पासून महावास्तु प्रणाली (बी.पी.एम.एस.) लागू करण्यात आली आहे. यात बांधकाम परवानगी अर्जदार नोंदणीकृत वास्तुविशारद व अभियंता यांचे मार्फत आॅनलाईन महावास्तु प्रणाली (बी.पी.एम.एस.) द्वारे नगरपरिषदेकडे सादर करेल. त्या अर्जाची बी. पी. एम. एस. द्वारे तांत्रिक छाननी होवून आॅनलाईन बांधकाम परवानगी प्रमाणपत्र अदा करण्यात येईल.
बांधकाम परवानगीसाठी प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:15 IST
सिन्नर : शहराची चौफेर वाढ होत असून नवनवीन रहिवाशी वसाहती, उपनगरे वसत आहेत. या पार्श्वभूमीवर सिन्नर नगरपरिषदेने सर्वसामान्य नागरिकांना नवीन घर बांधकामासाठी परवानगी देणे, भोगवटा प्रमाणपत्र देणे या बाबींसाठी महा-वास्तू प्रणाली (बी.पी.एम.एस.) लागू केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडून बांधकाम परवानगी, पुर्णत्वाचा दाखला मिळविणे सहजसुलभ होणार आहे.
बांधकाम परवानगीसाठी प्रणाली
ठळक मुद्देअभियंत्यांना अडचणीसंदर्भाात मार्गदर्शन; सुसूत्रतेसाठी प्रयत्न